ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
दिल्ली, पंजाब सरकार प्रमाणे २०० युनिट वीज मोफत देण्याची मागणी
वीज दरवाढी विरोधात ‘आप'चे आंदोलन
नवी मुंबई ः ‘महावितरण'कडून लॉकडाऊन काळात १ एप्रिल २०२० पासून २० टक्वके वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज महाराष्ट्र राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सदर प्रस्तावित वीज दरवाढी विरोधात ‘टीम आप नवी मुंबई'तर्फे २७ मार्च रोजी वाशीतील ‘महावितरण'च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, ‘आप'चे प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात राज्यभर महावितरण विरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी ‘शिवसेना'ने राज्यातील जनतेला आमचे सरकार आल्यास ३०० युनिट घरगुती वापरात ३० टक्वे स्वस्त वीज देण्याचे तर ‘भाजपा'ने विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागील दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ आणि मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर
येवून आंदोलने केली आहेत. पण, दुसरीकडे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद व्ोÀजरीवाल यांच्या नेतृत्वात सरकार गत आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीज पुरवठा करीत आहे. तसेच नव्याने आलेले पंजाब मधील भगवंत मान सरकारने सुध्दा १ जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. त्यामुळे जे इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही? असा सवाल ‘आप'चे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी सदर आंदोलनावेळी बोलताना उपस्थित केला.