दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्‌घाटन

नवी मुंबई ः ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून ठाणे ते ऐरोली दरम्यान उभारण्यात आलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. दरम्यान, माजी खासदार संजीव नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नुकतीच भेट घ्ोतली. दिघा रेल्वे स्थानकातील सर्व कामे पूर्ण झाली असून रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुले करण्याची मागणी केली. त्यावर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्‌घाटन करण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली. मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने नवीन दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक यांच्या समवेत पाहणी करुन कामाचा आढावा घेतला होता. यावेळी आ. गणेश नाईक यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना स्थानकाच्या कामासंदर्भात केल्या होत्या. सदर पाहणी दौऱ्यानंतर  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत आ. गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांची ३ मार्च रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय घ्ोण्यात आला.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मंडपाचे उद्‌घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न