मंडपाचे उद्‌घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न

बेलापूर गांव श्रीराम मंदिराजवळ आमदार निधीतून सभा मंडपाची उभारणी

नवी मुंबई ः बेलापूर गांव येथील श्रीराम मंदिरासमोर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या ५० लाख रुपयांच्या आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या सभा मंडप उभारण्यात आले आहे. या मंडपाचे उद्‌घाटन आ. सौ. मंदाताई
म्हात्रे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक दिनानाथ पाटील, अमित पाटील, नारायण मुकादम, मंदिर व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत
पाटील, सेक्रेटरी ओमकार पाटील, खजिनदार सुरेश म्हात्रे, उपाध्यक्ष बाळकृष्ण बंदरे, महादेव पाटील, ज्योती पाटील, रविंद्र म्हात्रे, शैला म्हात्रे धीरज पाटील, ज्योत्स्ना मानकामे तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते.
राम मंदिर येथे सुसज्ज सभा मंडप, निवारा शेड, बसण्याची व्यवस्था, स्टील रेलिंग पोल तसेच इतर तत्सम अशा सुविधा आमदार निधीतून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

संपूर्ण पंचक्रोशीत बेलापूर गांव हे रामनवमी उत्सवाकरिता गाजलेले गांव आहे. १९७६ मध्ये सासरी आल्यापासून बेलापूर गावात मी उत्सव आणि जत्रा साजरी करीत आहे. काहीही रुसवे-फुगवे न ठेवता सर्व भांडण-तंटे विसरुन
संपूर्ण गाव श्री राम जन्म वेळेस दर्शनासाठी  एकत्रित येतात. या मोठ्या अशा श्रीराम मंदिरात भजन, पुजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम पार पडताना भाविकांना सेवासुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता सुसज्ज सभामंडप, निवारा
शेड, लाईट आणि पंख्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, स्टील रेलिंग पोल तसेच चोहोबाजूंचे सुशोभिकरण अशा सुविधांसाठी आमदार निधीतून ५० लाख खर्च करण्यात आले असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
बेलापूर गाव माझी कर्मभूमी आहे. या गावाची सून म्हणून बेलापूर ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे माझे कर्तव्य आहे. शक्य होईल तेवढे मी या गावासाठी करु इच्छिते. गावातील गावकऱ्यांसाठी गणेश विसर्जन घाट आणि
दशक्रिया विधी घाटही उभारण्यात येणार आहेत, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यावेळी म्हणाल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ'च्या पनवेल मधील मुख्य वास्तुचे भूमीपुजन संपन्न