ओएनजीसी प्लांट व उरण पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन उरण यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

उरण ओएनजीसी येथे रक्तदान शिबीर संपन्न 

उरण : उरण येथील ओएनजीसी प्लांट व उरण पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन उरण यांच्या वतीने  शुक्रवार ( दि. २४ ) मार्च २०२३ सकाळी ८ ते सायंकाळी पर्यंत द्रोणागिरी भवन ओएनजीसी प्लांट,उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .६०७ रक्तदात्यांनी रक्तदान  केले .

जे.जे .हॉस्पिटल  मुंबई ,महात्मा गांधी सेवा मंदिर मुंबई ,एनएमएमसी रक्तपेढी वाशी ,सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई ,अपोली हॉस्पिटल नवी मंबई ,रिलायंस हॉस्पिटल कोपरखैरणे ,नवी मुंबई ,एमजीएम हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई आदि रक्तपेढीचे सहकार्य मिळाले .

शिबिराचे उद्घाटन कार्यकारी निर्देशक संयंत्र व्यवस्थापक शुसोजित बोस  उरण यांच्या हस्ते  झाले.  यावेळी मुख्य महाव्यवस्थापक - प्रमुख ऑपरेशन जयमोहन नायर , , मुख्य महाव्यवस्थापक - प्रमुख  अनुरक्षण विक्रम सिंह , महाव्यवस्थापक एम .सी .गौतम ,, प्रभारी मानव संताधन भावना आठवले , प्लांट  मॅनेजर बिश्वजीत बोस ,व्यवस्थापक गौरव पतंगे ,सरचिटणीस पी .ई .यु .मुंबई संतोष पाटील ,सेक्रेटरी विलेश घरत ,सेक्रेटरी समाधान मढवी ,सेक्रेटरी ओ बी सी इकबाल शेख ,घनश्याम घरत , विवेक पाटील ,उपसरचिटणीस पी .ई .यु .मुंबई  वैभव लवेकर व पी. ई .यु . कार्यकारिणी आणि सर्व सभासद आदींचे सहकार्य  मिळाले .

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओला-सुका कचरा वेगवेगळा देण्याचे नागरिकांना पुन्हा आवाहन