बालयोगी श्री सदानंद महाराज यांची प्रमुख उपस्थितीत हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार, प्राणप्रतिष्ठा

ऐरोली गावात हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार, मुर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

नवी मुंबई ः ऐरोली गांव येथील पौराणिक हनुमान मंदिराचा जिणोध्दार आणि मुर्तीची प्राणप्रतिष्ठा बालयोगी श्री सदांनद महाराज (तुंगारेश्वर) यांच्या शुभहस्ते २३ मार्च रोजी करण्यात आली. यावेळी ‘ग्रामस्थ मंडळ
ऐरोली गांव चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे भजन आणि किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

सन १९६८ साली स्वर्गीय पावशीबाई रामचंद्र मढवी यांनी ऐरोली येथील आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर हनुमानाची मुर्ती, गणेश मुर्ती, श्री कृष्ण मृर्तीची स्थापना केली होती. काही काळाने सदर मंदिर मोडकळीस आले होते.
त्यावेळी दामोदर रामचंद्र मढवी, एकनाथ रामचंद्र मढवी आणि मोहन रामचंद्र मढवी यांनी सदर मंदिर ऐरोली ग्रामस्थांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ‘ऐरोली गांव चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामस्थांनी आर्थिक आणि वस्तुरुपाने सढळ हस्ते मदत केली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त २२ मार्च रोजी सकाळी श्री गणेश, श्री हनुमंत आणि श्री कृष्ण मूर्तीची पालखीत वाजतगाजत मराठी शाळा मैदान ते हनुमान मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता गणेश पुजन, वास्तू पुजन आणि ग्रहहोम विधी संपन्न झाला. तर २३ मार्च सकाळी अभिषेक पुजन त्यांनतर कलशारोहण आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त २३ मार्च रोजी श्री ज्ञानाई सांस्कृतिक भजन मंडळ नवी मुंबई भजनरत्न ह.भ.प. महादेवबुवा शहाबाजकर यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २२ रोजी सायंकाळी हभप अजित महाराज
भिवंडी अंजुरदिवे यांचे किर्तन तर २३ मार्च रोजी सायंकाळी हभप डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री, श्री दृध्देश्वर गुरुकुल आळंदी यांच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार गणेश नाईक, आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, महापालिव्ोÀचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, आदि मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत फेरीवाल्यांना राजकारण्यांसह महापालिका-एपीएमसीचे अभय ?