योग विद्या निकेतनने या सुवर्ण महोत्सव वर्षांनिमित्ताने विविध योग विद्या कार्यक्रमाचे आयाेजन

योग विद्या निकेतनचा सुवर्ण महोत्सव साजरा 

नवी मुंबई -: स्व. पद्माश्री सदाशिव निंबाळकर यांच्या योग विद्या निकेतनचा ५० वा वाढदिवस  नुकताच वाशी येथे सुवर्ण महोत्सव वर्षाची सुरुवात म्हणून  साजरा करण्यात आले . यावेळी इंडीयन योगा असोसिएशनच्या हंसाजी योगेंद्र, ठाणे घंटाळी मित्र मंडळाचे श्रीकृष्णा म्हसकर, पनवेल आरोग्य सेवा समितीच्या मानसी वैशंपायन हे उपस्थित होते. 

योग विद्या निकेतने या सुवर्ण महोत्सव वर्षांनिमित्ताने विविध योग विद्या कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योग संस्थेतर्फे दोन प्रकारचे योग डिप्लोमा आहेत. या वर्षभरात योग शिक्षक प्रशिक्षक वर्ग आणि योगोउपचार आणि निसर्गउपचार हे कोर्स घेण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात ही वैद्यकीय उपचाराच्या जोडीला विविध प्रकारचो योगासने त्याचा शारीरिक दृष्ट्या उपयोग याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. योग उपचाराची खोली नीट समाजावी त्याचा दृष्टीकोन वैद्यकीय शास्त्र हुन कसा भिन्न आहे हे महिती देण्यात येईल. तसेच विविध जिल्ह्यात योग शिबीर तसेच इतर राज्यात ही घेण्यात येणार आहेत. वर्षभरात योग विद्याशी संबंधित तज्ञांसमवेत प्रत्येक महिन्यात व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे. शाळेत कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो' आंदोलन