नवरात्रौत्सवात आगरी-कोळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

ठाणे येथे चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात
  
ठाणे ः चैत्र नवरात्र निमित्त ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे २२ मार्च पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी नऊ दिवस माता देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. चैत्र नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी सदर ठिकाणी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून देवीचे दर्शन घ्ोतले. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी संतोष चौधरी प्रस्तुत दादुस आला रे या कोळीगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे दरवर्षी आगरी-कोळी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, संगीत आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येत असतो. त्यानुसा यंदा ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर क्षेत्रातील आगरी आणि कोळी समाजातील उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा खा. राजन विचारे यांच्या हस्ते गौरव करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. या सत्कारमुर्तींमध्ये ठाणे येथील मानसी दीपक तांडेल, ऋतूवीज किरण कोळी, सुजय सुरेश कोळी, विपीन भगवान कोळी, सुरेन कोळी, जगदीश महादेव भोईर, डॉ. गिरीश साळगावकर, तानाजी हरिचंद्र पाटील, हेमिता मढवी यांच्यासह नवी मुंबईतील साहित्यिक भानुदास सावळाराम पाटील (घणसोली), व्यावसायिक शंकर शिमग्या पाटील (सानपाडा), उत्वृÀष्ट तबलापटू गुरुनाथ मोतीराम पाटील (सानपाडा), भाईंदर-उत्तन येथील मच्छिमार कुटुंबातील सियोना वायाघर, धनश्री रवींद्र पाटील आदिंचा समावेश आहे. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी असलेल्या दादुस फेम संतोष चौधरी आणि त्यांची पत्नी यांना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाडव्यातील आनंदाच्या शिधाचा गोडवा कधी मिळणार रेशन कार्ड धारकांकडून सवाल पस्थित