वधू वर मेळाव्यात सांगितला सुखी जीवनाचा मूलमंत्र

ऐरोली येथे वधू वर मेळावा

  नवी मुंबई ः ऐरोली सेवटर ५ येथील श्री संत सावता माळी मंडळाच्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिन निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा व दुपारच्या सत्रात भव्य वधुवर मेळाव्याचे आयोजन १९ मार्च रोजी करण्यात आले होते.

   सकाळी मूर्ती अभिषेक व नंतर सत्यनारायण महापूजा पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रातील वधुवर मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित इच्छुक वधुवर व पालकांना सुप्रसिद्ध व्याख्यात्या आरती बनसोडे यांनी यशस्वी विवाहासंबंधी मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी समाजसेवक रविंद्र औटी यांनी सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र तडजोड हा असल्याचा सल्ला उपस्थितांना दिला. याप्रसंगी अतिथी सर्वश्री सुदाम गडेकर, आल्हाट, तानाजीशेठ शिंदे, शिवाजी डोके, सौ लता खाडे, व इतर मान्यवर उपस्थित होते. वधू वरांनी आपापला परिचय करून दिल्यानंतर त्यांना आपापसातील प्रत्यक्ष संवादासाठी वेळ दिला गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व माजी पदाधिकाऱ्यांह अध्यक्ष सूर्यकांत थोरात, सचिव रोहित भुजबळ, खजिनदार गोपीचंद साबळे, किसन नाईक, सौ उज्वला शिंदे आदिंनी परिश्रम घेतले. ज्ञानेश्वर कोल्हे यांनी सूत्रसंचालन  केले. वधूवर सूचक कार्यकारीणी, श्रमजीवी माळी महिला मंडळ, महात्मा फुले युवा उत्कर्ष कमिटी, उत्सव कमिटी आदींनी सक्रिय सहभाग दर्शवला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आजपर्यंतच्या सर्वच सरकारांकडून माथाडी कामगारांची बोळवण -नरेंद्र पाटील