लाभार्थ्यांसाठी आधार नोंदणी अद्ययावतीकरण शिबिर घ्यावे -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

राष्ट्रीय आरोग्य विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

ठाणे ः जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य विविध योजनांचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घ्ोतला. दरम्यान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तातडीने वितरीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करावी. तसेच शासकीय आरोग्य विषयक योजनांच्या लाभासाठी  आवश्यक आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गच्या जिल्हा नियामक मंडळाची बैठक, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, गुणवत्ता हमी कार्यक्रम आदि योजनांचा आढावा तसेच जन्म-मृत्यू नोंदणी आणि जीवनविषयक आकडेवारी संदर्भातील आढावा यावेळी घ्ोण्यात आला. सदर बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ. स्वाती पाटील यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, आदि दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, रोगी कल्याण समिती, टीबी-एचआयव्ही तपासणी आदि विविध आरोग्य विषयक उपक्रमांचा आढावा यावेळी घ्ोण्यात आला. टीबी, कुष्ठरोग आणि एचआयव्ही चाचण्या करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. विशेषत्वाने लहान मुलांच्या चाचण्यांवर भर द्यावा. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत नोंदणी शंभर टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत येणारा निधी आरोग्य व्यवस्थेवर पूर्ण खर्च होईल, याची दक्षता घ्ोण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि सीईओ जिंदल यांनी दिले.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळण्यासाठी आधारकार्ड मध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी दूर करुन आधार नोंदणीमध्ये आवश्यक ते बदल करुन घ्ोण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.

जन्म-मृत्युची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जन्म आणि मृत्यूची नोंदणी अहवाल ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने वेळेत सादर करावे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे, असेही शिनगारे यांनी सूचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल दिनकर पाटील