बेलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी गुढीपाडवा निमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा

नववर्ष स्वागतयात्रांमध्ये आ.मंदाताई म्हात्रे यांचा सहभाग

नवी मुंबई ः बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सीबीडी-बेलापूर, सीवुडस्‌, सानपाडा, वाशी अशा विविध ठिकाणी गुढीपाडवा निमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्यात आल्या. या सर्व शोभायात्रांमध्ये ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्ोतला. नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सहभागाने नवचैतन्य निर्माण झाले. दरम्यान, शोभायात्रावेळी ढोलताशा, ब्रास बँड आणि लेझीमच्या तालावर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी शोभायात्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलक हाती घ्ोतले होते. विविध ठिकाणच्या शोभायात्रा प्रसंगी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, दीपक पवार, सौ. सरोज पाटील, विजय वाळुंज, अजय वाळुंज, पांडुरंग आमले, प्रमिला खडसे, कल्पना छत्रे, रुक्मिणी पळसकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जपण्याच्या दृष्टीने सुरु झालेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा म्हणजेच शोभायात्रा गेली अनेक वर्षे नवी मुंबईमध्ये होत आहेत. वाशी येथील शोभायात्रेचे यंदा प्रथमच वर्ष आहे. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने आणि महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच गुढीपाडवा सणाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा मध्ये सामील होत नागरिकांनी आपला आनंदोत्सव साजरा केला, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. गुडीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली कित्येक वर्षाची परंपरा आहे. त्यानुसार सकाळ पासूनच सीबीडी-बेलापूर, सीवुडस्‌, सानपाडा, वाशी मध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मल्ल कसरती यांची ओळख करुन देणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा, ब्रास बँड, लेझीमच्या तालावर मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करुन दिली.महिलांनी पारंपरिक नथ, भरझरी साडी, हिरे, मोती आदि भूषणे परिधान करत बाईक रॅली काढली. प्रत्येकजण पक्षभेद विसरुन एकमेकांना आलिंगण देत शुभेच्छा देताना दिसले. त्यामुळे खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याचा सण साजरा होताना दिसला, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लाभार्थ्यांसाठी आधार नोंदणी अद्ययावतीकरण शिबिर घ्यावे -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे