एन्पल्यूएन्झा, कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव; महापालिका अलर्ट

एन्पल्यूएन्झा, कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव

नवी मुंबई ः मागील काही दिवसांपासून देशातील अनेक भागात आणि शहरात सद्यस्थितीत नियंत्रणात आलेल्या कोव्हीड-१९ रोगाचा प्रादुर्भाव आणि एन्पलुएन्झा (एच-१एन-२) संसर्ग या दोन्ही आजारांचे वाढते रुग्ण दिसून येत
आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. सध्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत असून वातावरणातील झपाट्याने होत असलेल्या बदलांचा परिणामही
प्रकृतीवर प्रभाव टाकताना दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात एच१एन१ च्या चाचण्या नोव्हेंबरपासून केल्या जात असून सदर चाचण्या निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क असून एच-१एन-२ किंवा ॲड्‌नोव्हायरसची शक्यता लक्षात घ्ोऊन अधिक दक्षतेने चाचण्या केल्या जात आहेत.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत १९७१३ इतक्या पल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून एच-१एन-२ पल्यू चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

एन्पलुएन्झा आजाराचा संसर्ग एच-१एन-२ या विषाणूमुळे होतो. पल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये इतर कोणतेही निदान झाले नसल्यास एन्पल्यूएन्झा करिता तपासणी करण्यात येते. अशा पल्यू रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या आधारे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. त्यापैकी सौम्य पल्यू रुग्णांवर लक्षणानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करण्यात येतो. अशा रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घ्ोऊन आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येतात. अति जोखमीच्या घरगुती निकट सहवासितांवर विशेष लक्ष देण्याकरिता सल्ला देण्यात येऊन त्यांना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार देण्यात येतात. मध्यम अथवा तीव्र स्वरुपाची पल्यूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचाराकरिता महापालिकेच्या वाशी, नेरुळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने सार्वजनिक रुग्णालय येथे गोळा करुन तपासणी करण्याची व्यवस्था सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे करण्यात आलेली आहे.

कोव्हीड-१९ आणि एन्पलूएन्झा एच-१एन-२ टाळण्यासाठी कोव्हीड कालावधीतील उपाययोजनांचा पुनर्उपयोग करणे आवश्यक आहे. त्याकरिता गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, साबण आणि स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, धुम्रपान टाळावे अशी खबरदारी घ्यावी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी गुढीपाडवा निमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा