नवी मुंबईत मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी

नवी मुंबई पावसाच्या जोरदार सरी 

वाशी, नवी मुंबई -: नवी मुंबईत मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने  काही काळ जनजीवन  जरी विस्कळीत झाले असले तरी पावसामुळे पहाटे वातावरणात  मात्र गारवा जाणवला.

  मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला झोडपल्यानंतर आता  मंगळवारी जोरदार वाऱ्या सह  मुंबई उपनगरात पावसाच्या सरी बरसल्या. नवी मुंबईला ही या अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे. या पावसाचा फटका सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चारकरमान्यांना बसला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडली.. तर पहाटे आलेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट मध्ये पावसाने खरेदीदार, व्यापारी, वाहतूकदार सर्वांची तारांबळ उडाली होती.फळ भाजी खरादीवरही पावसामुळे परिणाम होऊन ग्राहक कमी आल्याचे चित्र  बाजार आवारात पहावयास मिळाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एन्पल्यूएन्झा, कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव; महापालिका अलर्ट