नवी मुंबई महापालिका आयुवतांकडून नागरी सेवासुविधांचा आढावा

अधिकृत विक्रेत्यांना मार्केट मधील जागांचे लवकरच लॉटरीद्वारे वाटप

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांसुविधांचा तसेच शहरात सुरु असलेल्या विविध सुविधा कामांचा महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी आढावा घ्ोतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि संजय काकडे उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेच्या वतीने विविध विभागात मार्केटच्या वास्तू बांधून तयार असून तेथील जागांचे अधिकृत विक्रेत्यांना लॉटरीद्वारे वितरण करुन त्या जागा तत्परतेने वापरात येण्यासाठी कार्यवाही जलद करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

मंगल कार्यालयांच्या वास्तू सर्वसामान्य माणसांच्या लग्नादी समारंभाना उपयोगी पडतात. सदर बाब लक्षात घेऊन लग्नसराईचा कालावधी जवळ आल्याने नव्याने बांधून तयार असलेली मंगल कार्यालये आणि समाजमंदिरांच्या वास्तू आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया जलद करुन लवकरात लवकर वापरात येतील याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी बैठकीत दिले.

मोकळ्या मैदानामध्ये विविध समारंभाना देण्यात येणाऱ्या परवानगीमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर आयोजकांनी ती जागा स्वच्छ करुन देण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपविण्यात आलेली आहे. तरीही कार्यक्रम झाल्यानंतर ती जागा स्वच्छ न करता आहे तशीच कचरा पडलेल्या स्थितीत आयोजकांकडून अस्वच्छ ठेवली जात असल्याचे बहुतांशी ठिकाणी निदर्शनास आले आहे. सदर जागा वापराचे अनामत शुल्क अत्यंत अल्प असल्याने अनामत रक्कम जप्त केली तरी आयोजकांना फारसे आर्थिक नुकसान होत नाही. त्यामुळे अस्वच्छतेच्या सदर बाबीकडे आयोजकांकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, यामुळे मैदानात अस्वच्छता होत असल्याने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अनामत रक्कमेत वाढ करावी लागेल याही पर्यायावर सर्वांगीण विचार करण्यात आला. अशीच परिस्थिती मंगल कार्यालयांची असून त्याबाबतही विचार करण्यात आला, असे आयुवत नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक जलस्थिती आणि पर्यावरणस्थिती पाहता जलबचतीचे आवाहन