नेरुळ-उरण रेल्वे मार्गाचे लवकरच लोकार्पण

उरण ते सीएसएमटी दृष्टीक्षेपात

नवी मुंबई ः नेरुळ/बेलापूर ते उरण रेल्वे मार्गावरील बहुप्रतिक्षीत शेवटचा उरण पर्यंतचा टप्पा आता लवकरच खुला होण्याचे संकेत मिळत आहेत. या मार्गाचे लोकार्पण करण्याच्या अनुषंगाने झालेल्या कामांची पाहणी
करण्यासाठी ‘मध्य रेल्वे'चे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी १८ मार्च रोजी भेट दिली. या दौऱ्याची सुरुवात महाव्यवस्थापक लालवानी यांनी उरण रेल्वे स्थानकातून केली. याप्रसंगी महाव्यवस्थापक लालवानी यांच्या
समवेत ‘मध्य रेल्वे'चे डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर (डीआरएम) रजनिश कुमार गोयल, मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीएओ) विवेक कुमार गुप्ता, मुख्य अभियंता (सी-सीई) हरिशंकर चतुर्वेदी यांच्यासह ‘मध्य रेल्वे' प्रशासनातील
इतर अधिकारी, नेरुळ-उरण रेल्वे मार्ग प्रकल्पातील संबंधित अधिकारी, अभियंते तसेच रेल्वे स्थानकांची उभारणी करणारे कॉन्ट्रॅवटर उपस्थित होते. दरम्यान, ‘रेल्वे'चे सुरक्षा आयुवत मनोज अरोरा ४ मार्च रोजी या मार्गाची
पाहणी केली होते. त्यामुळे सुरक्षा आयुवत अरोरा यांच्याकडून पाहणी कोणत्याही क्षणी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर उरण शहर लोकल सेवेने थेट मुंबई, ठाण्याला जोडले जाणार आहे.

सुमारे २७ कि.मी. लांबीच्या नेरुळ/बेलापूर ते उरण रेल्वे मार्गातील नेरुळ/बेलापूर ते खारकोपर पर्यंतचा १२ किलोमीटरचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये लोकार्पित करण्यात आला होता. तेव्हापासून नेरुळ/बेलापूर ते
खारकोपर पर्यंत लोकल सेवा सुरु आहे. या लाकलसेवेचा उलवे, गव्हाणपाडा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना फायदा होत आहे. तेव्हापासून सर्वांनाच उरण लोकलसेवेची प्रतिक्षा आहे. सद्या उरणपर्यंत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे
कम पूर्ण झाले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकातील फलाटांची उभारणीदेखील झालेली आहे. तर इतर संबंधित कामे पूर्णत्वास आली आहेत.

दुसरीकडे मध्य रेल्वे प्रशासनाने नेरुळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्ग लवकर सुरु होण्यासाठी युध्दपातळीवर कामे करण्याचे निश्चित करुन ती जवळपास पूर्णत्वास आणली आहेत. नेरुळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्ग मार्च
महिनाअखेर सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने रेल्वे सुरक्षा आयुवत मनोज अरोरा यांची या मार्गावरील सुरक्षा विषयक पाहणी देखील महत्वाची आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सफाईमित्रांसाठी विशेष कार्यशाळा