न्यायालयीन कामकाजात सहभागी न होता वकीलांनी नोंदवला निषेध

वकीलाला पोलिसांकडुन झालेल्या मारहाणीचा नवी मुंबईतील वकीलांकडुन जाहिर निषेध  

नवी मुंबई : बोरिवली वकील संघटनेचे सदस्य ऍड.पृथ्वीराज झाला यांना कांदिवली पोलीस ठाण्यात पोलीसांकडुन झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नवी मुंबईतील सर्व वकीलांनी शनिवारी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यामुळे बेलापुर न्यायालयातील कामकाज शनिवारी ठफ्प झाले होते. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आलेल्या पक्षकारांचे चांगलेच हाल झाले.  

बोरिवली वकील संघटनेच्य सदस्य ऍड.पृथ्वीराज झाला यांना कांदिवली पोलिसांनी  पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. नवी मुंबईतील वकीलांनी देखील या घटनेचा जाहिर निषेध करुन न्यायालयीन कामकाज न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनने बेलापुर न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नसल्याची माहिती नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन अध्यक्ष सुनील मोकल यांनी दिली. या निषेध आंदोलनात नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे उपाधक्षय संदीप रामकर, सचिव किरण भोसले, सहसचिव अक्षय काशीद इतर पदाधिकारी तसेच वकील अलीम शेख, तुषार राऊत, योगेश केदार,आकाश पाटील, विनय दुबे, सदाशिव रेड्डी, योगेश माने यांच्यासह इतर वकील वर्ग मोठÎा संख्येन सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेतील १६३ पीएपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत कायम करण्याची मागणी