शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
45 हजार रुपये किमतीचे ई सिगारेट आणि विदेशी सिगारेट जफ्त
ई सिगारेट आणि विदेशी सिगारेटची विक्री करणारा पान शॉप चालक अटकेत
नवी मुंबई : खारघर सेक्टर-4 मधील पान शापमधुन छुफ्या पद्धतीने ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटची विक्री करणाऱया व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारुन अटक केली आहे. मिथलेश माणिकचंद साहु (39) असे या पान शॉप चालकाचे नाव असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या पान शॉप मधुन सुमारे 45 हजार रुपये किंमतीचे ई सिगारेट आणि विदेशी सिगारेट जफ्त केले आहेत.
खारघर सेक्टर-4 मधील भुमी टावर येथील सौरभ पान शॉपमधुन ई सिगारेट व विदेशी सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.सय्यद व त्यांच्या पथकाने गत मंगळवारी सायंकाळी खारघर सेक्टर-4 मधील भुमी टॉवर मधील सौरभ पान शॉपवर छापा मारला. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर पान शॉपची तपासणी केली असता, सदर पान शॉपमध्ये वेगवेगळ्या कंपनींचे व फ्लेवरचे सुमारे 45 हजार रुपये किमतीचे ई सिगारेट तसेच वेगवेगळ्या कंपनींचे विदेशी सिगारेटची पाकीटे सापडली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सौरभ पान शॉप चालक मिथलेश साहु याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा त्याचप्रमाणे कॉफ्टा कायद्यान्वे गुन्हा दाखल करून एकूण सुमारे 45 हजार रुपये किमतीचे ई सिगारेट आणि विदेशी सिगारेट जफ्त केले.