शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते पनवेल मधील लघुउद्योगिनींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान
७५ लघुउद्योगिनींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान
पनवेल ः शेतकरी कामगार पक्षाच्या माजी नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या संकल्पनेतून माजी आमदार बाळाराम पाटील तसेच माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते पनवेल मधील लघुउद्योगिनींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
स्त्रियांमधील क्षमता कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी मदत करते. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून आपल्यातील कला जोपासत स्त्री आपल्या कृतीतून स्वतःचा आत्मविश्वास वाढवित आहे. अशा प्रकारे आजची स्त्री खऱ्या अर्थाने सखी, सहचारिणी आणि सक्षम बनत आहे. आपल्यातील कला जोपासत काही स्त्रिया आपले कुटुंब सांभाळत छोटे छोटे उद्योग करीत असतात. अशा स्त्रियांच्या कर्तुत्वावर शाब्बासकीची थाप देण्याकरिता माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन केला.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील तसेच माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपस्थित राहून लघु उदयोगीनींचा सन्मान केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात ७५ लघुउद्योगिनींचा सन्मान सोहळा सदर छोटेखानी कार्यक्रमाद्वारे करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बीरमोले, देसाई काका-काकू, मनिषा परदेशी, वैशाली शाह, आदि उपस्थित होते.