शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बालनाट्य ‘ये गं ये गं परी'
तळमळ एका अडगळीची बालनाट्य नमुंमपा राज्यस्तरीय करंडक विजेते
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित नमुंमपा करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान' यांनी सादर केलेल्या ‘तळमळ एका अडगळीची' या बालनाट्याने सर्वोत्तम सादरीकरण
करीत विजेतेपद पटकाविले. आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते त्यांना २५ हजार रक्कमेचे पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आले. कखग, पुणे या बालनाट्य संस्थेने सादर केलेल्या ‘सात फेटेवाला' या
बालनाट्याने द्वितीय तसेच दिलखुश स्पेशल स्कुल या नाट्यसंस्थेने सादर केलेल्या ‘वारी' या बालनाट्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
दरम्यान, ‘वारी' बालनाट्य दिलखुश स्पेशल स्कुलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केले. ते अनुभवताना परीक्षकांसह प्रेक्षकांचेही डोळे पाणावले. पारितोषिक स्विकारताना उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवित या दिव्यांग कलावंतांच्या जिद्दीला कौतुकाची दाद दिली. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विशेष सादरीकरणाचे सर्वोत्कृष्ट बालनाट्य पारितोषिक नाट्यस्वरुप फाऊंडेशन यांनी सादर केलेल्या ‘ये गं ये गं परी' या बालनाट्याला मिळाले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विशेष सादरीकरणाचे सर्वोत्कृष्ट बालनाट्य पारितोषिक नाट्यस्वरुप फाऊंडेशन यांनी सादर केलेल्या ‘ये गं ये गं परी' या बालनाट्याला मिळाले.
स्पर्धेमध्ये संदेश विद्यालय, विक्रोळी यांच्या ‘योध्दा' तसेच नाट्य संस्कार ॲकॅडमी यांच्या ‘जिर्णोध्दार' या बालनाट्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके संपादन केली. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशी प्रत्येक क्षेत्रासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिकेही परीक्षकांच्या शिफारशीने प्रदान करण्यात आली. सांघिक अभिनयाचे विशेष परीक्षक शिफारस पारितोषिक तळमळ एका अडगळीची या बालनाट्याला प्रदान करण्यात आले.
नमुंमपा करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी आ. गणेश नाईक यांच्यासह क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सुप्रसिध्द
अभिनेत्री अदिती सांरगधर, आस्ताद काळे, श्वेता पेंडसे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, आदि उपस्थित होते.