खारघर शहरातील अनेक नागरिकांनी गेल्या वर्षांपासून ‘खारघर नो-लिकर झोन' साठी मागणी

‘खारघर नो-लिकर झोन'साठी आ.प्रशांत  ठाकूर  आग्रही

पनवेल ः ‘खारघर नो-लिकर झोन' होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करुन या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.

पनवेल महापालिका हद्दीतील खारघर शहरातील अनेक नागरिकांनी गेल्या वर्षांपासून सातत्याने केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने अलिकडच्या काळामध्ये नव्याने दिलेले काही परवाने या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिकामंध्ये असंतोष आहे. त्यमुळे लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरचा आवाज बुलंद केला. खारघर शहर पूर्वी खारघर ग्रामपंचायत होती. त्यावेळी देखील सदर ठिकाणी दारुबंदी सर्व नागरिकांनी आणि सर्व व्यवस्थेने स्वीकारली होती. मधल्या काळामध्ये महापालिका झाली आणि महापालिका झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काही ठराविक व्यावसायिकांनी खारघर विभागात सर्रासपणे पुन्हा दारु कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत, असे आमदार ठावूÀर म्हणाले.

खारघर आणि परिसरामध्ये मेडीकल, इंजिनिअरींग, मॅनेजमेंट अशी विविध १७ महाविद्यालये आणि ३५ शाळा आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये या परिसरात अवैधरित्या ड्रगचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आणि पोलिसांनी कारवाई केली आहे. नायजेरियन वंशाच्या लोकांच्या टोळ्या या परिसरात ड्रग्ज संदर्भात कार्यरत आहेत. येथील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तो खूप मोठा धोका आहे. हजारो विद्यार्थी खारघर परिसरामधील हॉस्टेलमध्ये निवास करतात. अशा वेळेला ड्रग्ज आण दारुची विवृÀती पसरु नये त्यासाठी ‘खारघर नो-लिकर झोन'ची (दारुबंदी) मागणी सातत्याने केली जात आहे, असे आ. प्रशांत ठावूÀर यांनी यावेळी स्पष्ट व्ोेÀले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बालनाट्य ‘ये गं ये गं परी'