खारघर मध्ये एकदिवसीय संत समागम संपन्न

परमात्मा प्राप्तीनेच जीवनाला उचित मार्गदर्शन -सद्‌गुरु माता सुदीक्षाजी महाराज

खारघर ः परमात्म्याच्या प्राप्तीनेच जीवनाला उचित मार्गदर्शन प्राप्त होते. जेव्हा आपले परमात्म्याशी मिलन होते, आपण त्याच्या रंगात रंगून जातो आणि क्षणोक्षणी त्याची जाणीव ठेवतो तेव्हा आपल्या मनामधील समस्त नकारात्मक भावना आपोआपच संपून जातात. त्या जागी प्रेम हेच जीवनाचे सार बनून जाते. असे उद्‌गार निरंकारी सद्‌गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी खारघर मध्ये व्यवत केले.

खारघर येथील सेंट्रल पार्क समोरील सिडको मैदानावर आयोजित केलेल्या एक दिवसीय भव्य निरंकारी संत समागम मध्ये उपस्थित निरंकारी सद्‌गुरु माता सुदीक्षाजी महाराज जनसमुहाला संबोधित करत होत्या.
जेव्हा आपल्याला या परमात्म्याची जाणकारी प्राप्त होते, तेव्हा सर्वांभूती याचेच दर्शन घडत राहते. मग कोणाबद्दलही मनामध्ये भेदभाव उरत नाही. सर्वांच्या प्रति सद्‌भाव उत्पन्न होऊन परोपकाराची भावना मनामध्ये जागृत होते, असे माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या.

तर निरंकारी राजपिता रमित यांनी आपल्या संबोधनामध्ये सांगितले की, मनुष्य जन्म मोठ्या भाग्याने मिळतो आणि  जन्म प्राप्त झालेल्या प्रत्येक मानवाला या सत्याशी अवगत होण्याचा अधिकार असतो. संत-महात्मा, गुरु, पीर, पैगंबर यांनी  सदोदित मानवाला मोहनिद्रेतून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवाला हेच समजावले आहे, की तु आपल्या मूळ स्वरुपाला जाणून घ्ो. खरे पाहता तू शरीर नाहीस आणि धनदौलत, जायदात किंवा सत्ता तुझ्यासाठी मुळीच महत्वाचे नाहीत. या सर्व गोष्टी मूल्यहीन आहेत, असे त्या म्हणाल्या.

सदर संत समागमामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, पुणे आदि क्षेत्रातून भक्त सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर शहरातील अनेक नागरिकांनी गेल्या वर्षांपासून ‘खारघर नो-लिकर झोन' साठी मागणी