महाविकास आघाडीतर्फे मालमत्ताकराबाबत नागरिकांची सातत्याने दिशाभूल

शेकाप व मविआच्या ढोंगीपणाला जनता कंटाळली

पनवेल: मालमत्ता कराविरोधात पनवेलमध्ये सोमवारी मोर्चा काढून पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेविरोधात विष कालवण्याचे काम महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भाजप सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी करीत आहे. म्हणूनच एकीकडे विकास कामे आणि त्याच वेळेला पनवेलकरांच्या माथ्यावर कराचे ओझे येऊ नये याची भाजपच्या नेतृत्त्वाने सातत्याने काळजी घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या युतीच्या शिवसेना-भाजप सरकारमुळेच पनवेल महानगरपालिकेला न्याय मिळत असल्याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले

महाविकास आघाडीतर्फे मालमत्ताकराबाबत नागरिकांची सातत्याने दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप झाल्यानंतर सत्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (दि. 15) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, अमर पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, बबन मुकादम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर,  कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रारुप विकास आराखड्यावर बोगस हरकती