पार्कींगच्या जागांचा प्रत्यक्ष वापर सुरु होण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई महत्वाची -राजेश नार्वेकर

शहर पाकाींग व्यवस्थापनाचा महापालिका आयुवतांकडून आढावा

नवी मुंबई ः मागील काही वर्षात नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यांच्या पार्कींगची मोठी अडचण जाणवत आहे. याकरिता शहरातील पार्कींग व्यवस्थेचे नियोजन प्राधान्याने कार्यवाही करण्याचा
मुद्दा असल्याचे लक्षात घ्ोत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घ्ोऊन पार्कींग समस्येचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे, प्रशासन-मालमत्ता विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड तसेच इतर कार्यकारी अभियंता आणि सबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त नार्वेकर यांनी शहरातील पार्कींग प्लॉटची विभागनिहाय माहिती घ्ोत संबंधित प्लॉटचा सद्यस्थितीत होत असलेला  वापर जाणून घ्ोतला. अभियांत्रिकी विभागामार्फत २०१६ ते २०१८ या कालावधीत शहरातील वाहनांचे
विभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल मालमत्ता विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतरच्या काळातही शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असल्याने सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी
वाढ होणाऱ्या वाहन संख्येचा विचार करन नियोजन करावे. त्यानुसार ‘सिडको'कडून प्राप्त झालेल्या पार्कींग प्लॉटचा वाहने पार्कींगयोग्य विकास करण्यासाठी बहुमजली पार्कींग सुविधा विकसित करण्यापूर्वी सद्यस्थितीत समांतर पातळीवर वाहने पार्कींग सुरु होईल याचे  नियोजन करुन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.

‘सिडको'कडून पार्कींगसाठी हस्तांतरीत झालेल्या भूखंडांचा पार्कींगयोग्य विकास करण्याप्रमाणेच ‘सिडको'कडे मागणी केलेल्या मात्र अद्याप हस्तांतरीत न झालेल्या पार्कींग प्लॉटची यादी तयार करुन त्याविषयी अधिक प्रभावीपणे
पाठपुरावा करावा. पार्कींग प्लॉट ताब्यात मिळण्याविषयी तत्पर कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी मालमत्ता विभागाला दिले. तसेच रस्त्यावर पार्कींग होणाऱ्या वाहनांबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यास वाहन चालकांकडून पार्कींगच्या जागांचा प्रत्यक्ष वापर सुरु होईल याकडे लक्ष वेधत आयुक्तांनी वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रत्येक विभागातील पार्कींग प्लॉटची सद्यस्थिती जाणून घ्ोत आयुक्तांनी शहराच्या पार्कींग व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या दृष्टीने पार्कींग पॉलिसीमधील दरांबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. त्यादृष्टीने सिडको व्यवस्थापनामार्फत वाशी रेल्वे स्टेशन नजिक तसेच इतर ठिकाणी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबत माहिती घ्ोऊन ती सादर करण्याचे तसेच त्यांच्या पार्कींग धोरणाचीही माहिती घ्ोण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच इतर शहरांमधीलही पार्कींग धोरणाविषयी माहिती घ्ोऊन त्याचा तुलनात्मक अभ्यास करुन तपशील सादर करावा, अशा सूचनाही आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाविकास आघाडीतर्फे मालमत्ताकराबाबत नागरिकांची सातत्याने दिशाभूल