अवकाळी पावसाचा पांढऱ्या कांद्याच्या पिकाला फटका

पांढऱ्या कांद्याच्या हंगामाला  उशिराने सुरुवात; दरातही घसरण

नवी मुंबई  -: राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा पांढऱ्या कांद्याच्या पिकाला फटका बसला आहे. परिणामी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील कांदा बटाटा मार्केट मध्ये यंदा पांढरा कांदा उशिराने दाखल होत आहे. तर सदर कांद्याला भाव देखील कमी मिळत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १२ रू कमी असून बाजारात मात्र १०-१५ प्रतिकीलो रुपयांना उपलब्ध होत आहे. हा कांदा आरोग्यासाठी गुणकारी  असल्याने याला  उन्हाळ्यात विशेष मागणी असते. आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या  पांढऱ्या  कांद्याला विशेष मागणी असते  राज्यात या कांद्याची  अलिबाग ,वसई ,नागपूर, नाशिक आदी ठिकाणी थोड्या प्रमाणात 

लागवड होते .तर गुजरात मध्ये अधिक प्रमाणात होते.  त्यामुळे पीएमसी बाजारात नाशिक,नागपूर इथून कमी तर गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या कांद्याची आवक होते. वर्षभर बाजारात  तुरळक प्रमाणात पांढरा दाखल होत असतो, परंतु उन्हाळ्यात कांद्याचा हंगाम सुरू होतो.  यावर्षी मध्यंतरीच्या पडलेल्या अवकाळी पावसाने  कांद्यांची लागवड उशिराने केली आहे . त्यामुळे कांदे उशिराने दाखल झाले आहेत. आज ही बाजारात पांढरा कांदा, गावरान कांद्याचा हंगाम सुरू होण्यासाठी एक ते दोन आठवड्याचा विलंब लागत आहे. सध्या बाजारात अवघ्या १-२गाड्या दाखल होत आहेत तेच मागील वर्षी ५ ते ६ गाड्या आवक होती. लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने पांढऱ्या कांद्याचे दरही गडगडले आहेत, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

वाशी कृषी उत्पन्न बाजारातील कांदा.बटाटा आवारात  एपीएमसी बाजारात यावर्षी पांढऱ्या कांद्याच्या हंगामाला विलंब होत आहे. शिवाय लाल कांदे दर घसरले आहेत. त्यामुळे पांढऱ्या कांद्याचे दर ही कमी आहेत. मे महिन्यात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. - मनोहर तोतलानी,  कांदा बटाटा व्यापारी, एपीएमसी

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रारुप विकास योजनेविषयीच्या सूचना-हरकतींच्या सुनावणीस प्रारंभ