महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी समर्थनार्थ घोषणाबाजीही

महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी ‘इंटक'ची निदर्शने

नवी मुंबई ः ‘एकच मिशन, जुनी पेन्शन' या मोहिमेतंर्गत नवी मुंबई  महापालिका मुख्यालयात महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आग्रही मागणी करताना समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. महापालिका कर्मचारी आणि अधिकारी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले होते.

कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत सकाळपासून महापालिका मुख्यालयात उपस्थित राहून आंदोलनात आक्रमक भूमिका मांडत होते. तर महापालिका मुख्यालयात आयुक्त उपस्थित नसल्याने जुन्या पेन्शनसाठीचे निवेदन कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना दिले. जुन्या पेन्शनासाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनात इंटक त्यांच्या पाठीशी असून जुनी पेन्शन योजनेसाठी
कर्मचारी-अधिकारी करत असलेली मागणी रास्त आहे. कर्मचारी-अधिकारी यांना न्याय मिळेपर्यत इंटक त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याची ग्वाही यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी