‘माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत आयोजित ‘सायवलोथॉन'ला अडीचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्साही प्रतिसाद

‘सायवलोथॉन'द्वारे ‘माझी वसुंधरा अभियान'चा पर्यावरणपूरक संदेश प्रसारीत

नवी मुंबई ः स्वच्छतेसोबतच पर्यावरण विषयी अत्यंत जागरुक असणाऱ्या नागरिकांमुळेच नवी मुंबई स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण रक्षण, संवर्धनातही राज्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. ‘माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत आयोजित ‘सायवलोथॉन'ला अडीचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिला. याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सहभागी सायकलपटुंचे कौतुक केले.

माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभाग आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायवलोथॉन' स्पर्धेवेळी ‘माझी वसुंधरा अभियान'ची सामुहिक शपथ देत आयुवत राजेश नार्वेकर यांनी  हिरवा झेंडा दाखवून ‘सायवलोथॉन'चा शुभारंभ केला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा ‘नमुंमपा माझी वसुंधरा अभियान'च्या नोडल अधिकारी सुजाता ढोले, उपायुक्त सोमनाथ पोटरे, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, सायकलिस्ट क्लब ऑफ इंडियाचे प्रमुख जय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘पर्यावरण-वातावरणीय बदल विभाग'तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये नवी मुंबई राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर असून यावर्षीही प्रथम क्रमांक कायम राखण्याचा निर्धार करीत व्यापक लोकसहभाग घ्ोत पर्यावरणपूरक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणूच ‘सायवलोथॉन'सारख्या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोराज सर्कल ते महापालिका मुख्यालय पर्यंतच्या साधारणतः ८ कि.मी. अंतराच्या ‘सायवलोथॉन'मध्ये सहभागी होत सदरचे अंतर पार करणाऱ्या सायकलपटुंना मुख्यालय ठिकाणी प्रशस्तीपत्रे प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ४ वर्षीय मुलगा हर्ष विजय जाधव विशेष आकर्षण ठरला. वय वर्षे ४ ते वयाची साठी पार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी ‘सायवलोथॉन'मध्ये उत्साही सहभाग घ्ोत सदर पर्यावरणशील उपक्रम यशस्वी केला.

प्रवास करण्यासाठी हरित पर्यायांचा विचार करण्याची आणि शहरात हरित मार्ग निर्माण करण्यासाठी कटीबध्द असणाऱ्या नागरिकांमुळेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला सायक्लोथॉन उपक्रम यशस्वी झाला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवघर ग्रामस्थांचे रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलन