शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
उरणकरांची २५ वर्षांची प्रतिक्षा संपणार
नेरुळ-उरण मार्गावर मार्च अखेरपासून लोकलसेवा?
नवी मुंबई ः उरणकरांची गेल्या २५ वर्षांपासून असलेली लोकलची प्रतिक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे. नेरुळ-बेलापूर ते उरण या २७ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गावर पहिल्या टप्प्यात उलवे नोडमधील खारकोपरपर्यंत धावणारी लोकल आता थेट उरणपर्यंत धावणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावरील रेल्वे रुळ उभारणीचे काम पूर्ण झाले असून रेल्वे स्थानक आणि ट्रॅकची तपासणी सुरु झाली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा आयुवतांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उरण मार्गावरील लोकलसेवा या मार्च महिनाअखेर सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, १० मार्च रोजी ट्रायल रन साठी आलेली लोकल उरण स्थानकात शिरल्यानंतर उरणकरांनी एकच जल्लोष केला. उरण रेल्वे स्थानकातून आता लवकरच थेट सीएसएमटी पर्यंत लोकल प्रवास सुरु होणार असल्याने उरणकरांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकर्षाने दिसून आला. १९९१ च्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहारांना जोडणारा हार्बर रेल्वेमार्ग सुरु करण्यात आला. हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल लोकल सेवा सुरु झाल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्ग सुरु करण्यात आला. त्यावेळी उरणला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडण्यासाठी नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची आखणी करण्यात येऊन प्रत्यक्षात १९९७ मध्ये नेरुळ-उरण रेल्वेमार्ग उभारणीची घोषणा करण्यात आली. यनंतर प्रत्यक्षात २०१२ मध्ये नेरुळ-उरण या २७ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर अनेक भागात वन विभागाची जागा, तद्नंतर पर्यावरण विषयक विविध परवानग्या, भूसंपादन, आदि प्रक्रियांमुळे या मार्गाचे काम रखडले गेले. त्यामुळे नेरुळ-उरण मार्गावर १२ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्यात खारकोपर पर्यंत लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ४ नोव्हेंबर २०१८ रोजी नेरुळ/बेलापूर ते खारकोपर मार्गावर लोकल सेवा सुरु करुन पहिल्या टप्प्यातील कामाचा श्री गणेशा करण्यात आला. यानंतर उरणपर्यंत लोकलसेवा सुरु करण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले. वेंÀद्र आणि राज्य शासनाच्या संबंधित विभागांकडून परवानग्या, भूसंपादनाच्या कामाचा वेग वाढविण्यात आला. मुंबईला थेट उरण शहराशी जोडणाऱ्या, बहुप्रतीक्षित नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या नेरूळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी नेरूळ-उरण रेल्वे काही दिवसांतच थेट उरणला पोहोचणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरुळ/बेलापूर-उरण लोकल सेवा सुरु करण्यासाठी यापूर्वी सप्टेबर २०२२ची डेडलाईन दिली होती. परंतु, विविध तांत्रिक समस्या आणि इतर अडचणींमुळे गेले काही महिने या मार्गावरील कामे होऊ शकली नाही. नेरुळ-उरण रेल्वे मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कनेविटव्हीटीसाठी खूप महत्वाचा आहे. त्याअनुषंगाने रेल्वे स्थानक इमारती उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे. दुसरीकडे नेरुळ-उरण रेल्वे मार्ग लवकरच या मार्च महिनाअखेर सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याअनुषंगाने ४ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुवत मनोज अरोरा यांनी या मार्गावर सुरक्षा विषयक
पाहणी केली. यानंतर १० मार्च रोजी प्रत्यक्षात उरण रेल्वे स्थानकापर्यंत लोकलची ट्रायल रन घेण्यात आली.
दरम्यान, सीआरएस इन्स्पेक्शन सुरु झाले असून रेल्वे सुरक्षा बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर उरणपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. एकंदरीतच या मार्च महिनाअखेर नेरुळ-उरण लोकल सेवा सुरु होण्याची शवयता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यवत केली आहे.
नेरुळ-उरण मार्गावरील स्थानके...
अशा नेरुळ-उरण या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिडको (७७ %) आणि रेल्वे (३३ %) यांची भागीदारी असून या रेल्वे मार्गावर नेरुळ, सीवुडस्, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर नंतर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण अशी स्थानके असणार आहेत. यातील सारगरसंगम स्थानक रद्द करण्यात आल्याचे समजते.