उरण मध्ये पहिली लोकल रेल्वे ट्रेन दाखल

उरण रेल्वे स्थानकावर वाटचाल करणारी पहिली लोकल रेल्वे ट्रेन ही रेल्वे रुळावरुन सरावासाठी ( ट्रायलसाठी )दाखल

उरण : उरण मध्ये पहिली लोकल रेल्वे ट्रेन दाखल झाल्याने उरण करांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार दि१० मार्च २०२३ रोजी सकाळच्या सत्रात मुंबई शहराच्या दिशेने उरण रेल्वे स्थानकावर वाटचाल करणारी पहिली लोकल रेल्वे ट्रेन ही रेल्वे रुळावरुन सरावासाठी ( ट्रायलसाठी )दाखल झाली आहे.

मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण हा महत्त्वाचा तालुका आहे.अशा या महत्वाच्या तालुक्यातील रहिवाशांना गेली २५ वर्षांपासून लोकल रेल्वे ट्रेनची प्रतिक्षा लागून राहिली होती.मात्र रेल्वे प्रशासनाच्या रेंगाळत पडलेल्या कामामुळे सदर लोकल रेल्वे ट्रेन ही खारकोपर रेल्वे स्थानकात मागील पाच वर्षांपूर्वी येऊन ठेपली होती.त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी उरण मध्ये केव्हा लोकल रेल्वे ट्रेन दाखल होणार याची उत्सुकता उरणकरांना, प्रवासी नागरिकांना लागून राहिली होती.

सध्या उरण शहराजवळील उरण, द्रोणागिरी आणि रांजणपाडा या तीन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्वास गेले आहे.तर जासई, गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण रेल्वे स्थानकांचे काम हे प्रगतीपथावर आहे.एकंदरीत असे असताना रेल्वे प्रशासनाने मार्च २०२३ अखेरीस उरण मध्ये लोकल रेल्वे ट्रेन धावण्याचा मानस, संकल्प व्यक्त केला आहे.त्याचा भाग म्हणून शुक्रवार दि १० मार्च २०२३ रोजी सकाळच्या सत्रात मुंबई शहराच्या दिशेने उरण रेल्वे स्थानकात लोकल रेल्वे ट्रेनचा सराव प्रवास सुरू झाल्याने उरणकरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक - प्रा. वृषाली मगदूम