शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
व्हॉटस्ॲप आणि यु-ट्युबच्या जमान्यात विद्यार्थ्यांमध्ये विचारांची शिदोरी आणि संस्कार मनात रुजविण्याची गरज महापालिका आयुवत राजेश नार्वेकर
‘तेजाकडून तेजाकडे'द्वारे प्रा.प्रवीण दवणे यांचा युवा संवाद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर धनापेक्षा मनाच्या प्रश्नांचे फार मोठे आव्हान - प्रा.दवणे
नवी मुंबई ः आजच्या युवा पिढी अर्थात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर धनापेक्षा मनाच्या प्रश्नांचे फार मोठे आव्हान असणार आहे. परीक्षेच्या काळात फवत मार्कस् मिळविण्याइतपत घोकंपट्टी, ओकंपट्टी करण्यापेक्षा उमजून आणि समजून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेला उत्तम पिढी घडविणारा माणूस म्हणून जगायला शिका, अशी आर्त साद सुप्रसिध्द साहित्यिक, कवि तथा वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घातली. दरम्यान, आजच्या युवा पिढीच्या उत्तम भवितव्यासाठी सर्वप्रथम पालकांनी देखील सजग असावेत असे सांगत प्रा. दवणे यांनी या वयातच स्वतःला ओळखून विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर रहात आत्मविश्वासाने आणि ध्येयाने येणाऱ्या वादळांना आणि संकटांना तोंड दिले पाहिजे, असे सांगितले.
नवी मुंबईतील महाविद्यालयीन युवकांकरिता स्वामी विवेकानंदांच्या विचारावर आधारित तेजाकडून तेजाकडे अर्थात युवकांचे स्वामी विवेकानंद असा प्रा. प्रवीण दवणे यांनी संकल्पीत केलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन ‘नवी मुंबई प्रेस क्लब'तर्फे १० मार्च रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई पोलीस आयुवत मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर, अतिरिवत आयुवत संजय काकडे, ‘नवी मुंबई प्रेस क्लब'चे अध्यक्ष मनोज जालनावाला, पत्रकार मच्छिंद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. आपण जेथे असतो, तेथे मनाने नसतो. परिणामी, आपण सर्वच जण विभागले गेलेलो आहोत. त्यासाठी एकाग्रता आणि समग्रता महत्वाची आहे. या वयात आपण कोण आहोत, तेच कळतच नाही. एकंदरीतच बाह्य सौंदर्यावर प्रेम करणारी आजची पिढीला सतत आरशासमोर राहिल्याने स्वतःचे प्रतिबिंब देखील दिसत नसल्याची खंत प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यवत केली. आज ज्याप्रमाणे इंग्रजीवर प्रेम केले जाते, तेवढेच प्रेम आपल्या मातृभाषेवर देखील केले पाहिजे.
पूर्वजांच्या संस्कृतीवर, मातृभूमीवरील मातीवरही प्रेम करा. श्रीमंत गाढव होण्यापेक्षा समृध्द माणून म्हणून बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन करीत प्रा. दवणे यांनी विविध उदाहरणे आणि प्रसंग स्पष्ट करुन सांगितले. आजचे विद्यार्थी २१ व्या शतकातील असून त्यांनी गुगल आणि चॅट संस्कृती वेगाने अंगिकारलेली आहे. भविष्यात नवकी आपण काय करायला पाहिजे, याचे योग्य मार्गदर्शन या पिढीला मिळणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा योग्य मार्गदर्शनाअभावी आजची पिढी भरकटण्याची शवयता आहे. त्यामुळे व्यवतीमत्व घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कतर्ृत्व असणे पुरेसे नसून त्याला मार्गदर्शनाची जोड महत्वाची आहे. समाजातील चांगला घटक फवत माणसाचे व्यवतीमत्वच बनवत असते, असे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती साधताना समाजाचा विचार करणे क्रमप्राप्त असून फवत योग्य सांगत घालता आली पाहिजे. महत्वाचे म्हणजे आजचा युवा संवाद फवत ऐकण्यासाठी नसून तो विद्यार्थ्यांच्या मनात विचार रुजविण्यासाठी असल्याचे पोलीस आयुवत म्हणाले.
तर आजच्या व्हॉटस्ॲप आणि यु-ट्युबच्या जमान्यात विद्यार्थ्यांमध्ये विचारांची शिदोरी आणि संस्कार मनात रुजविण्याची गरज असून त्यासाठी अशा युवा संवाद उपक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी केले.
सदर कार्यक्रमास महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुवत डॉ. बाबासाहेब राजळे, मराठी साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, साहित्तिका डॉ. राजेश्री, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, माथाडी हॉस्पिटलच्या अधिकारी डॉ. राजश्री पाटील यांच्यासह केबीपी (मॉडर्न), आयसीएल, रा.फ.नाईक, टिळक, आदि विविध कॉलेजचे प्राध्यापक, पत्रकार आणि सुमारे १२०० विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रयुगात आज चोहो दिशांनी माहितीचा भडीमार होत आहे. अशा परिस्थितीत ताण-तणावात भरडल्या गेलेल्या तरुण पिढीला वात्सल्यपूर्ण विश्वास देण्याची आवश्यकता भासत आहे. या तरुण पिढीसमोर सकारात्मक विचारांचा आदर्श असणे त्यांच्या पुढच्या सशक्त वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यादृष्टीने आपल्या देशातील महान तत्वज्ञ, विचारवंत, जगविख्यात कुशल वक्ते स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न ‘नवी मुंबई प्रेस क्लब'तर्फे करण्यात आला. या माध्यमातून नवी मुंबईतील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे तेजोमय विचारांचा प्रकाश घेऊन गेल्याचे मनोज जालनावाला यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक तथा महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे यांनी केले.