विविध मागण्यांची दखल घेण्यासाठी पनवेल महानगर पालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे बेमुदत आंदोलन

पनवेल महानगर पालिका कर्मचारी १४ मार्च पासून  जाणार बेमुदत संपावर

पनवेल : महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, कामगार संघटना फेडरेशनव राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी पुकारलेल्या बेमुदत संपच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल महानगर पालिका कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी १४ मार्च २०२३  पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कामगार नेते सुरेश ठाकूर यांनी दिली .यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे पनवेल विभाग अध्यक्ष  शरद कांबळे, मुन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी  संघाचे महासचिव सतीश चिंडालीया, मुन्सिपाल एम्प्लॉईज युनियनचे पनवेल विभाग अध्यक्ष  शैलेश गायकवाड ,आदीजण उपस्थित होते .

- कामगारांच्या ,कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणेत यावी.
- कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाल सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन रंगांच्या सेवा नियमित करण्यात यावी,
- राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदांमधील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणा करावा. (आरोग्य विभागात अग्रक्रम द्यावे ) तसेच चतुर्थश्रेणी व वाहनचालक कर्मचा-यांच्या पदभरतीस केलेला  मज्जाव  तात्काळ  हटविण्यात यावा. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा.
- सर्व अनुषंगिक भत्ते केंद्र शासनाप्रमाणे मंजूर करण्यात यावेत. वाहतुक, शैक्षणिक व इतर भत्ता), चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची मंजुर पदे निरस्त करू नयेत. तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात. शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे.,
- सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणेत यावे.
- नवीन शिक्षण धोरण रद्द करणेत यावे.  नर्सेस आरोग्य कर्मचा-यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे.अशा विविध मागण्यासाठी  पनवेल महानगर पालिका कर्मचारी १४ मार्च २०२३  पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कामगार नेते सुरेश ठाकूर यांनी दिली.

 ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत व नगरपरिषदांमध्ये केलेल्या पुर्वीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना  बिनाअट सेवेत सामावुन घेवुन मयत ग्रामपंचायत कर्मचान्यांना अनुकंपा तत्वावरीत नियुक्त्या तातडीने देण्यात नगरपरिषद कर्मचाऱ्यांना  सातवा वेतन आयोग लागू करुन फरक अदा करण्यात यावा. नगरपरिषद कर्मचान्यांना १२ वर्षे व २४ वर्षे व सातव्या वेतन आयोगानुसार १०/२०/३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ व फरक त्वरीत देण्यात यावा.
 दिनांक २७/०३/२००० पुर्वीच्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावुन घेतले असुन मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्यापपर्यंत अनुकंपा तत्वानुसार समाविष्ट करून घेतलेले नाही. सदर वारसांना अनुकंपा तत्वाचा  लाभ तातडीने लागू करणेत यावा, अशा विविध मागण्यांची दखल सरकारने घेऊन कामगारांना कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे बेमुदत आंदोलन करणार असल्याचे कामगार नेते सुरेश ठाकूर,शरद कांबळे,अनिल जाधव यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्हॉटस्‌ॲप आणि यु-ट्युबच्या जमान्यात विद्यार्थ्यांमध्ये विचारांची शिदोरी आणि संस्कार मनात रुजविण्याची गरज महापालिका आयुवत राजेश नार्वेकर