आणीबाणीच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल तर्फे मोफत सीपीआर प्रशिक्षण

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल तर्फे मोफत सीपीआर प्रशिक्षण

नवी मुंबई ः कोपरखैरणे मधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल तर्फे नवी मुंबईकरांसाठी सीपीआर प्रशिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण शहरातील १ लाख लोकांना देण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीची हृदयक्रिया अचानक बंद पडल्यास सीपीआर देण्याचे मोफत प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. सुरुवातीला १ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत सीपीआर प्रशिक्षण अभियान चालवले जाईल. कॉर्पोरेट ऑफिसेस, सार्वजनिक जागा आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये देखील प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.
द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमामध्ये कॉर्पोरेट कर्मचारी, विविध गृहसंकुलांमधील रहिवासी, ऑटो-रिक्षा चालक, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, नवी मुंबई महापालिका कर्मचारी, नवी
मुंबई परिवहन विभागाचे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मॉल्स, रेल्वे स्थानके, सार्वजनिक उद्यानांमधील लोक अशा विविध गटांना सहभागी करुन घेतले जाईल.

सदर उपक्रमासाठी हॉस्पिटलने टास्क फोर्स तयार केली आहे. सीपीआर प्रशिक्षणातील तज्ञांचा समावेश असलेल्या पाच टीम्स यामध्ये आहेत. इन-हाऊस प्रशिक्षण शिबिरे घेण्यासाठी एक टीम हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात येईल. इतर चार टीम्स विविध ठिकाणी जाऊन वयस्कांना सीपीआर देण्याचे प्रशिक्षण देतील तसेच नवजात बाळे आणि मुलांना सीपीआर देण्याबाबत व्याख्याने देतील. प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या नोंदणीसाठी हॉस्पिटलने रजिस्ट्रेशन कमिटी देखील तयार केली आहे.  व्यक्तिशः येऊन किंवा ई-मेल, दूरध्वनीवरून किंवा ऑनलाईन देखील नोंदणी करता येईल. सर्व प्रशिक्षणार्थींना नीट प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षक, मॅनीकिन्स आणि
सत्रांची संख्या पुरेशी राहील याची काळजी कमिटी घेईल. अचानक हृदयक्रिया बंद पडल्याच्या अनेक घटना हल्ली कानावर येतात. हृदय विकारांमुळे होणाऱ्या एकूण मृत्युंपैकी ५० % मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने होतात. अशावेळी इमर्जन्सी सीपीआर किंवा कार्डिओपल्मनरी रिसससिटेशनमुळे व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. सीपीआर अत्यावश्यक जीवन कौशल्य असून ते प्रत्येकाला आत्मसात असलेच पाहिजे.आणीबाणीच्या प्रसंगी मृत्यू होणे टाळण्याची क्षमता या कौशल्यामध्ये आहे. द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन उपक्रमामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असतात, त्याचे नवी
मुंबईकरांना आम्ही प्रशिक्षण देऊ, असे हॉस्पिटलचे संचालक तथा प्रमुख डॉ. बिपीन चेवले यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विविध मागण्यांची दखल घेण्यासाठी पनवेल महानगर पालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे बेमुदत आंदोलन