‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन'मध्ये ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते बक्षीस वितरण

उमेद आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सत्कार

नवी मुंबई ः महिला उद्द्योजिकांच्या यशोगाथा, माहितीपट आणि लघुपट निर्मिती स्पर्धेत सिंधुदूर्ग कणकवलीतील न्यू खुशबू स्वयंसहाय्यता समुहाने प्रथम पारितोषिक पटकावले. या समुहाला राज्याचे ग्राम विकास-पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक ३ लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' (उमेद) तर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या समुहांचा ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३'च्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

उमेद अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांच्या कामाचे चित्रीकरण करण्यात आले. या स्पर्धेत नंदूरबार, खोडांबळीचे जितेंद्र रमेश खवळे यांना द्वितीय पारितोषिक २ लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक तर सोलापूर, उत्तर सोलापूरचे सचिन अशोक जगताप यांना तृतीय पारितोषिक १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. रायगड म्हसळाचे अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या., यवतमाळ राळेगावचे आनंद कसबे, कोल्हापूर वाळीवडेचे ऋतुराज रातपुते आणि कोल्हापूर करवीरचे गजानन भोसले यांना उत्तेजनार्थ ५० हजार रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

उमेद अभियानांतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य आणि ज्ञानस्पर्धेत जनरल इडीपीसाठी औरंगाबादच्या आश्विनी क्षीरसागर यांना प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक तसेच रत्नागिरीच्या अदिती जाधव यांना द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. ॲग्रीकल्चर  इडीपीसाठी प्रथम पारितोषिक बीडच्या मयुरी रविंद्र शिंदे, द्वितीय पारितोषिक माधुरी तगडे, प्रोडक्ट इडीपीसाठी प्रथम पारितोषिक मानसी पाटील तर द्वितीय पारितोषिक सिता डोंगर, प्रोसेस इडीपीसाठी प्रथम पारितोषिक कविता डोंगरे तर द्वितीय पारितोषिक मोनिका जाधव यांना देण्यात आले.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते उमेद अभियानाच्या आर्थिक सामवेशन विभागामार्फत ग्रामीण भागात बँकांच्या सेवा सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने तसेच बचत गटांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी उमेद आणि इंडिया पेस्ट पेमेंट बँक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उमेद आणि जागतिक महिला बँक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आणीबाणीच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल तर्फे मोफत सीपीआर प्रशिक्षण