वाहतुक पोलिसांचा मदर तेरेसा यांच्या प्रेमदान या अनाथ आश्रमातील महिलांसोबत जागतिक महिला दिन साजरा

अनाथ आश्रमातील महिलांसोबत कोपरखैरणे वाहतुक पोलिसांनी केला महिला दिन साजरा  

नवी मुंबई : कोपरखैरणे वाहतुक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱयांनी ऐरोली येथील मदर तेरेसा यांच्या प्रेमदान या अनाथ आश्रमातील महिलांसोबत काही क्षण घालवुन  आगळ्या वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी कोपरखैरणे वाहतुक शाखेतील महिला वाहतुक पोलिसांचा देखील सन्मान करण्यात आला.  

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन कोपरखैरणे वातहुक शाखेचे प्रभारी विश्वास भिंगारदिवे व त्यांच्या सहकाऱयांनी ऐरोलीतील मदर तेरेसा यांच्या प्रेम दान या अनाथ आश्रमात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाहतुक पोलिसांनी सदर अनाथ आश्रमातील वृद्ध महिलांना पुष्पगुच्छ व खाऊ देऊन त्यांच्यासोबत काही क्षण घालविले. त्याचप्रमाणे वाहतुक पोलिसांनी तेथील महिलांसोबत गाणी गाऊन त्यांच्यासोबत गफ्पा गोष्टी करुन त्यांना एक प्रकारे आधार देण्याचे काम केले. कोपरखैरणे वाहतुक शाखेतील अधिकारी व अंमलदारांकडुन मिळालेल्या या अनोख्या प्रेमामुळे अनाथ आश्रमातील महिला भारावुन गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वाहतुक पोलिसांचे कौतुक केले. यावेळी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी महिला दिनाचे औचित्य साधुन आपल्या वाहतुक शाखेतील महिला अमंलदारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक महिला दिन वाशीमध्ये पार पडला कर्तबगार महिलांचा कौतुक सोहळा