एनआरआय पोलीस ठाणे तर्फे महिला कर्मचाऱ्यांसह मान्यवर महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी विशेष वेलनेस आणि व्यायाम विषयक मार्गदर्शन

नवी मुंबई ः जागतिक महिला दिनानिमित्त एनआरआय पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल  यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी विशेष वेलनेस आणि व्यायाम विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवर,  एनआरआय पोलीस ठाणेच्या हद्दीतील महिला दक्षता कमिटी सदस्या, महिला सामाजिक संघटनांच्या सदस्यांसह महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार, आदि ४५ ते ५० महिला उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमात ग्लोबल वेलनास आम्बे सिटर ऑफ इंडिया ॲन्ड वेलनेस स्पा एवस्पर्ट सौ. रेखा चौधरी प्रमुख ववत्या म्हणून उपस्थित होत्या. सौ. रेखा चौधरी यांनी उपस्थित महिलांना वेलनेस तसेच व्यायाम आणि वयाची तमा महिलांना काय करता येऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तोरडमल यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह उपस्थित मान्यवर महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भांडूप परिमंडलात ‘लाईनमन दिवस' उत्साहात साजरा