शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
एक गाव एक होळीची परंपरा कायम
नवी मुंबईत गावोगावी मोठया उत्साहात होळी साजरी
नवी मुंबई : २१ व्या शतकातील आधुनिक शहर बनत चाललेल्या नवी मुंबई शहरात काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी येथील अनेक गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा पुर्वीप्रमाणेच जोपासली जात आहे. शहरी भागात गल्ली, बोळात होळ्या पेटविल्या जात असल्या तरी येथील गावा गावात असलेली ‘एक गाव, एक होळी’ची परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे.
२१ व्या शतकातील आधुनिक शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या सणांची परंपरा आणि संस्कृती कायम राखत गावागावात पारंपरिक पद्धतीने आणि मोठया भक्ती भावात होळीचा सण साजरा करण्यात आला. हवलूबाय हवलू बाय तुझ्या शराचं नाव काय! शराचं नाव मुंबय शर तुझ्या पाटलाचं नाव काय! हे गाण होळी आली की हमखास ऐकायला मिळतात. फाल्गुन शु.म्हणजे होळी.भारतात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय साजरा करतात. मात्र आगरिकोळी समाजात या सणाला अनन्य महत्व आहे.नवी मुंबईतील दिवाळे गाव ते ऐरोली गाव अशा सर्व गावात होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे कोकणात शिमगोत्सव साजरा केला जातो अगदी त्याच जोशात नवी मुंबईतही होळी साजरी केली जाते. होळीची चाहुल ही होळीच्या नऊ दिवस अगोदर सिरी होते.काही गावात होळीचा सण येत आहे म्हणून नऊ दिवस अगोदर पासून पासून शेकोटी(हाऊल कुकुर)पेटवली जाते.होळीच्या दिवशी दुपारी होळी लावण्याच्या जागेचे पूजन केले जाते आणि होळी उभी केली जाते.होळीला पुरण पोळी करंज्या , साखर हलवा आणि विशेष करून तांदळाच्या पापडी, पुरण पोळी चे नैवेद्य दाखवीले जाते.सायंकाळी गावातील सवाशींनी होळीची विधिवत पूजा करतात.त्यानंतर रात्री गावांच्या मानकऱ्यांचर हस्ते होळीला अग्नी दिली जाते. व पेटत्या होळी समोर ज्येष्ठ महिला समोरा समोर गाणी म्हणतात.
जावयांना विशेष मान
आगरी कोळी समाजात होळीला जावयाला विशेष मान दिला जातो. होळीच्या आधी ज्याचे लग्न झाले आहे अशा जावयांना सासरी आमंत्रित केले जात.या दिवशी जावयाला गोडधोड जेवण,तसेच भेटवस्तू दिली जाते. व होळी पेटल्यावर जावई होळीला नारळ अर्पण करतात. तर कोपरखैरणे गावात ग्रामस्थ मंडळातर्फे या जावयांचा विशेष सत्कार केला जातो.
नवरा नवरीचे सोंग
होळी निमित्त कोकणात ज्या प्रकारे नानाविध सोंगे केली जातात त्याच प्रकारे नवी मुंबईत नवरा नवरीचे सोंग केले जाते. यात लहान मुलांची प्रतीमात्मक वरात काढून ती गावभर फिरवली जाते व सर्व ग्रामस्थ वराती बनून नाचत असतात.
ज्येष्ठ महिलांची पोसद मागणी बंद होत चालली
होळीला सोंग घेण्याची कला आहे . त्याच प्रमाणे धुळवडीला पोसद मागण्याची परंपरा येथील समाजात आहे.गावातील ज्येष्ठ महिला तांब्याचा कडा घेऊन घरोघरी जातात.आणि घरातील याजमाच्या नावाने गाणी म्हणतात. मात्र आज येथील गावा गावात काँक्रिटचे जंगल उभे राहत असल्याने हातावर मोजण्या इतक्याच गावात ज्येष्ठ महिला पोसद मागताना दिसत आहेत.
शिरवणे गावात महिलांनी पेटवली होळी
नवी मुंबई गावा गावात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आणि ही होळी पेटवण्याचा मान येथील पाटील किंवा पारंपरिक असलेल्या कुटुंबांनाच असतो आणि शक्यतो पुरुष लावत असतात.मात्र. शिरवने येथे या परंपरेला छेद देत होळी पेटवण्याचा मान महिलांना देत महिला दिन पूर्व महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या हस्ते ही होळी पेटवन्यात आली.