शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
होळीच्या नैवेद्याच्या पोळ्या पोहोचवल्या विविध गरजूंपर्यंत
होळी नैवेद्याच्या सुमारे ११०० पोळ्या गरीबांच्या घरापर्यंत पोहचवल्या
नवी मुंबई ः शिवसेना शाखा क्रमांक ७९ व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने होळी करा लहान, पोळी करा दान' उपक्रम राबविण्यात आला. सानपाड्यातील नागरीकांनी त्यास भरघोस प्रतिसाद दिला.
६ मार्च रोजी सायंकाळी सानपाड्यातील सोसायट्यांमधून होळीच्या नैवेद्याच्या ११०० पोळ्या गोळा करण्यात आल्या. तुर्भे व नेरूळ येथील गरीब वस्तीत नेऊन गरजू लोकांना या गोळा केलेल्या पोळ्या देण्यात आल्या. सर्व थरातील नागरिकांना नैवेद्याची पोळी गरजूंना देण्याची ही संकल्पना भावली. परंपराना वर्तमानाशी जोडून विवेकी समाज घडवणारा हा कृतीशील उपक्रम आहे. सण उत्सव साजरे करताना आपल्या गरीब बांधवांना आपल्या आनंदात सामावून घेऊया असा संदेश या कृतीतून देण्यात आला. सदर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी बाबाजी इंदोरे, मंगेश लाड, किरण वाळुंज, सुयोग सुर्वे, मिनिष कोठारी, अश्विन तुपे, रोहित चोरमले, ओम ढमाळ व अशोक निकम यांनी परिश्रम घेतले.