शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
सचिनदादा धर्माधिकारी यांच्या दीक्षांत सोहळ्याला लोटला लाखोचा जनसागर
निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना लाखो अनुयांच्या उपस्थितीत डी लीट पदवी प्रदान
नवी मुंबई : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिनदादा धर्माधिकारी यांना श्री जगदीश प्रसाद झामरलाल टीब्रेवाला विद्यापीठाकडून विशेष मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मान करण्यात आला. रविवारी वाशी येथील एक्जीबिशन सेंटर मध्ये अभूतपूर्व सोहळ्यात पार पडलेल्या या दीक्षांत सोहळ्यात दोन लाखाहून अधिक श्री सदस्य उपस्थित होते.
कोरोना नंतर मुंबई लगतच्या परिसरात प्रथमच असा भव्य दिव्य कार्यक्रम झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे रायगड सह नवी मुंबईतून दोन लाखाहून अधिक श्री सदस्य उपस्थित होते.
जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या दीक्षांत सोहळ्याला एवढी लोक उपस्थित राहण्याची ही जगातली पहिलीच वेळ शनिवारी संध्याकाळपासूनच हजारो श्री सदस्य वाशी येथील एक्जीबिशन सेंटर मध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली होती. हे श्री सदस्य एक्जीबिशन सेंटर तसेच आजूबाजूच्या परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने बसून याची देही याची डोळा या कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. यावेळी समिती प्रमुखांकडून तसेच श्री सदस्यांकडून चोख नियोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे 5 हजार श्री सदस्यांनी मागील दहा दिवसांपासून या सोहळ्यासाठी अहोरात्र मेहनत घेत सेवा दिली. श्री दासगणांना या सोहळा अनुभवता यावा यासाठी वाशी रेल्वे स्टेशन ते हायवे व वाशी गावापर्यंत ठिकठिकाणी एलएडी स्क्रीन व साउंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच ज्या सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता तिथल्या भव्य सभागृहात जवळपास 16 हजार दासगण बसले होते .पार्किर्ग क्षेत्रात 35 हजार,आसाम भवन ते ग्रीन स्केप बिल्डिंग परिसरात 15 हजार तर महाराष्ट्र भवनच्या मोकळ्या भूखंडावर 12 हजार तसेच याशिवाय एक्झिबेशन सेंटर च्या परिक्षेत्रा खेरीज रस्त्यावर देखील बसूनजवळपास 2 लाखाहून आधी दासगणांनी सोहळ्याला उपस्थित राहिले होते..नवी मुंबई पोलिसांन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही श्री सदस्याला काही आरोग्याबाबत अडचणी आल्यास त्यासाठी खास आरोग्य कक्ष उभारण्यात आले होते.
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानचे संचालक सचिन दादा धर्माधिकारी यांना श्री जगदीश प्रसाद झांबारमाल टिबरेवाल विद्यापीठाने ही पदवी बहाल केल्यामुळे या कार्याचा गौरव अधिकच वाढला असून हा खऱ्या अर्थाने लाखो श्री सदस्यांचा सन्मान असल्याचा उद्गार उपस्थित मान्यवरांनी यावेळी काढले.