होळीला लागणाऱ्या तांदूळ पापडीची कला लोप पावत चालली

नवी मुंबईतील बहुतांश नागरिक तयार पापडीवर विसंबून

नवी मुंबई -: नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात येथील भूमिपुत्रांनी आपल्या सणांची परंपरा आजही कायम टिकवून ठेवली आहे.आणि या सणांना नानाविवीध नैवद्य बनवण्याची परंपरा आहे.आणि त्यातीलच एक होळीला लागणारी पापडी.मात्र आज नवी मुंबई शहरात चुलीची जागा गॅस ने घेतल्याने पापडी बनवण्याची कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे काही लोकांना आज तयार पापडी वर विसंबून राहावे लागत आहे.

महाराष्ट्रात ज्या होळीचा सण साजरा केला जातो अगदी त्यात जोशात  नवी मुंबईतील आगरी कोळी समाजात होळी साजरी केली जाते. धुळीवंदनाच्या एक दिवस आधी होळी पेटवली जाते.आणि होळीला करंजी,पोळी,तांदळाची पापडी नैवद्य म्हणून दाखवली जाते. मात्र येथील गाव गावठांणाने कात टाकत असल्याने  गावातील चूल आज  हद्दपार होत चालली आहे आणि त्याची जागा गॅसने घेतली आहे. त्यामुळे होळीसाठी लागणाऱ्या या तांदळाची पापडी बनवणे दुर्मिळ होत चालले आहे. मात्र होळीला  पापडिचा नैवद्य  दाखवणे हे आगरी कोळी समाजात क्रमप्राप्त असल्याने काही लोकांना तयार पापडीवर विसंबून राहावे लागत आहे.आणि अशा तयार पापड्या शहरात  नवी मुंबई शेजारील उरण तालुक्यातील गावा गावातुन विक्री साठी येत असतात.

नवी मुंबई शहर जरी आधुनिक होत चालले असले तरी येथील भूमिपुत्रांनी आपले सण,संस्कृती,कला टिकवण्यावर भर दिला पाहिजे.त्यामुळे  आपल्या सणांना जे काही नैवद्य लागते ते जर कुणाला येत नसेल तर आपल्या  समाजातील ज्येष्ठ महीलांकडून निसंकोच ते शिकून घेतले पाहिजे.- सुगंधा शरद पाटील, तुर्भे गाव, नवी मुंबई.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आ.गणेश नाईक यांची महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत बैठक