तुर्भे गावात गटारांच्या कामात निकृष्ठ दर्जा

नवी मुंबई ः तुर्भे गांव, सेवटर-२१, २२ गावियो अंतर्गत गटारांची थीन व्हाईट टॉपिंग लेचरने सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. परंतु, सदर काम निकृष्ठ  दर्जाचे होत असल्याने या कामाची पाहणी आणि चौकशी करुन उचित कारवाई करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग'चे सचिव डॉ. विनोद शंकर पाटील यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे  केली आहे.

निविदा नोंदणी नमुंमनपा/ब -१/श.अ ./२९६/२०२-१२२ अंतर्गत तुर्भे गांव, सेवटर-२१, २२ गावियो येेथे गटारांची थीन व्हाईट टॉपिंग लेचरने सुधारणा काम करण्याचे काम सुरु आहे. परंतु, सदर काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे. यापूर्वी सुस्थितीत असणाऱ्या या गटारांचे स्लॅब जेसीबी ब्रेकरने तोडावे लागत आहे. शिवाय गटारे पूर्णतः नव्याने न बांधता फवत त्यावर स्लॅब उभारुन ती बंदिस्त केली जात आहेत. त्यामुळे या कामांच्या देखरेखीवर असणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी कंत्राटदार करीत असलेल्या निकृष्ठ कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. गटारांचे स्लॅब भरताना संंबंधित अभियंता पाहणीसाठी उपस्थित नसतो, असे डॉ. विनोद पाटील यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सदर कामाचा ठेका घेतलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्यासंदर्भात मी महापालिका प्रशासनाकडे १८ जानेवारी २०२२ रोजी अर्ज केला होता. पण, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, सदर कंत्राटदार असे निकृष्ठ दर्जाचे काम वारंवार करीत आहे. त्यामुळे सदर कामाची पाहणी आणि चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी डॉ. विनोद पाटील यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन