ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा

मराठी भाषा एक ध्यास आहे, एक ऊर्जा आहे - प्रा. अजित मगदूम

नवी मुंबई ः मराठी भाषा एक ध्यास आहे, एक ऊर्जा आहे. बोलण्यातील इंग्रजी शब्द येतात ते टाळले पाहिजेत. मराठी बोलताना चुकणाऱ्यांंना हळुवारपणे समजावून सांगायला हवं. शब्दांचे अर्थ समजून मगच त्यांचा वापर करा; अशी आपण भूमिका घ्यायला हवी. कारण मराठी भाषा ही आपली संस्कृती म्हणून टिकवली पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातून सुरुवात करावी लागेल. असे प्रतिपादन प्राध्यापक अजित मगदूम यांनी नेरुळ येथे केले.

नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयातर्फे २७ फेब्रुवारी रोजी संघाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मगदूम बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश लखापते, उपाध्यक्ष रमेश गायकवाड, प्रभाकरराव गुमास्ते, दीपक दिघे, दिलीप जाधव, रणजीत दीक्षित, शाम परकाळे, दत्ताराम आंब्रे, अजय माढेकर, पांडुरंग क्षेत्रमाडे, विजय सावंत, श्रीमती सीमा आगवणे, श्रीमती वैशाली मगदूम, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत घनश्याम परकाळे यांनी लिहिलेल्या कॉमन मॅनया पुस्तकाचेही प्रकाशन प्रा. अजित मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.मराठी भाषेच्या वैभवासाठी सर्वांनी मराठीतून बोलले पाहिजे हा मतितार्थ असलेली आणि भाषेचा संदेश देणारी स्वरचित कविता कवी गजानन म्हात्रे यांनी सादर केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमांत मराठी भाषा नेहमीच अग्रस्थानी असल्याचे नमूद करुन मराठी भाषेचा सर्वांनीच अभिमान बाळगला पाहिजे असे संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी सांगितले.  या कार्यक्रमाचे नियोजन विकास साठे यांनी केले. 

 

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे गावात गटारांच्या कामात निकृष्ठ दर्जा