सहाय्यक आयुवत समाधान इंगळे यांच्याकडून जाणली समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती

‘भाजपा अनुसूचित जाती मोर्चा'च्या शिष्टमंडळाची जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला भेट

नवी मुंबई ः राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ समाजकल्याण कार्यालयाच्या मदतीने कसा घेता येईल या संदर्भात सरकारी यंत्रणा आणि त्यांचे कामकाज कसे चालते ते समजून घेण्याच्या उद्देशाने भाजप अनुसूचित जाती मोर्चा, नवी मुंबईच्या वतीने १ मार्च रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समाजकल्याण कार्यालयात सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांची भेट घेण्यात आली.

भाजप महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा, नीती आणि शोध प्रमुख तसेच अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबईचे प्रभारी मयुर देवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विकास बबन सोरटे यांच्या पुढाकाराने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुवत समाधान इंगळे यांच्यासमवेत बैठक पार पडली. सदर बैठकीत राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ समाजकल्याण कार्यालयाच्या मदतीने कसा घेता येईल या संदर्भात सरकारी यंत्रणा आणि त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.

सदर बैठकीमध्ये समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ नवी मुंबई मधील मागास वस्तीतील लोकांना कसा देता येईल, अनुसूचित जातीतील प्रत्येक घटकापर्यंत योजनांबाबत जागरुकता निर्माण करुन त्यांच्या पर्यंत सदर योजना कशा पोहोचवता येतील, त्याबाबतचे सुनियोजन कसे करावे तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या अधिकृत सामाजिक संस्थांची रखडलेली कामे, वस्तीतील समाज मंदिरे, बुध्द विहार, हॉल, आदिंची पुनर्बांधणीच्या कामांसाठी शासकीय अनुदानाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संबंधित सामाजिक संस्थांना भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मदतीने सहकार्य कसे करता येईल, ठाणे जिल्हाधिकारी समाज कल्याण विभाग कार्यालयाच्या माध्यमातून कौशल्य विकास,
स्टार्टअप सारख्या विविध योजनांमधून लघु उद्योगांचे प्रशिक्षण देऊन तरुण उद्योजकांना रोजगार उपलब्ध करुन देणे, महिलांना आणि महिला बचत गटांना समाजकल्याण विभागामार्फेत मोफत घरघंटी, आधुनिक शिलाई मशील, फुड व्हॅन आणि लघुउद्योग कशा प्रकारे उभे करता येतील याबद्दल चर्चा करण्यात आली. याशिवाय विद्यार्थांना सदर विभागाच्या माध्यमातून स्कॉलरशीप आणि फ्रीशीप कशा प्रकारे मिळवुन देता येईल याबाबतही साधक बाधक चर्चा झाली. स्ीप्ी्‌ंू.ुदन्.ग्ह या संकेतस्थळावरुन महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अभियांत्राकी शिक्षण घेणारे विद्यार्थी फ्री शीप साठी ध्हत्ग्हा अर्ज करु शकतात. यामध्ये त्याची फी, साहित्य, घरभाडे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. याकरिता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च२०२३ आहे.

याप्रसंगी विकास सोरटे यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चा, नवी मुंबईचे पदाधिकारी विजय वाघमारे, योगेश अभंग, सुमेध गायकवाड, विशाल साबळे, सुमेध साळवे, कुलदिप केदारे, मंगेश साळुंखे, पराग चांदोरकर, आदि उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छतेबाबत नो कॉम्प्रोमाईज -राजेश नार्वेकर