‘सकल हिंदू समाज'तर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा

नवी मुंबईत भगवे वादळ

नवी मुंबई ः लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधातील कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा या मागणीसाठी ‘सकल हिंदू समाज'च्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी वाशीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. कोपरी नाका, सेक्टर-२८ येथील ब्लू डायमंड हॉटेल चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. भगवे झेंडे, भगव्या पताका हातात घेऊन हजारो नागरिक सहभागीझाले होते. सर्वांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबईत भगवे वादळ अवतरले होते. युवा, महिला, विद्यार्थी, जेष्ठ, विविध हिंदू पंथ आणि संप्रदायाचे, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. महिला भगिनींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रध्दा वालकर प्रकरणी  आरोपी आफताबला जन्मठेपेची  शिक्षा मिळावी, लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी ‘सकल हिंदू समाज'तर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी यह प्रेम नही यह धोका है, गर्व से कहो हम हिंदू है, लव्ह जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, वंदे मातरम, जय श्रीराम...जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मोर्चावेळी प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.  
या मोर्चात आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, भाजपा आयटी सेल प्रमुख सतीश निकम, माजी नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के, सौ. माधुरी सुतार, आदिंनी सहभाग घेतला.

सदर मोर्चाची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. या ठिकाणी लव जिहाद मध्ये बळी पडलेल्या मुलींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्त्या धर्मप्रचारक काजल हिंदुस्थानी यांनी उपस्थित नसमुदायाला संबोधित केले. धर्मांध सापांना दूध पाजू नका ते विषारी फुत्कारच सोडणार आहेत. अशा जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका. नवी मुंबईत लँड जिहाद चालू आहे. नेरुळ येथे दर्गा बनवला, टी. एस. चाणक्य येथेही दर्गा आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षे विषयी धोका असल्याच्या अहवालावर केंद्र सरकारने तो तोडण्यास सांगूनही नवी मुंबई महापालिका तो तोडत नाही. एपीएमसी मार्केट मध्ये ८ अनधिकृत मशीद, नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानक येथे दर्गा आणि मशीद बनविण्यात आल्या आहे. लव्ह जिदाह आणि लँड जिहाद चालू असल्याने वेळीच आर्थिक बहिष्कार करणे आवश्यक आहे. तसेच सरकारने या विषयी कठोर कायदे करावे, असे आवाहन काजल हिंदुस्थानी यांनी यावेळी केले.

मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न केले जात आहे. यानंतर धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे लव जिहाद विरोधातील कायदा लवकरात लवकर सरकारने केला पाहिजे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी टाकून त्यांना कमजोर केले जात आहे. सदर सर्व प्रकार थांबले पाहिजेत. लव जिहाद, लँड जिहाद विरोधात लवकरात लवकर कायदा झाला पाहिजे. लव जिहाद विरोधात सदरचा जनजागरण मोर्चा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकरात लवकर करावा. बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. भारतीयांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे, असे आ. गणेश नाईक यांनी सांगितले.

या मोर्चाची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. या ठिकाणी लव जिहाद मध्ये मध्ये बळी पडलेल्या मुलींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धर्मप्रचारक काजल हिंदुस्तानी यांनी यावेळी उपस्थित त्यांना हिंदू राष्ट्राची हाक देत लव जिहाद लँड जिहाद आणि ड्रग जिहाद यांचा आतंकवादाशी संबंध आहे असा आरोप केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मराठी राजभाषा दिन'निमित्त ‘मनसे'चा अभिनव उपक्रम