रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर

समाजपयोगी उपक्रमातून  रवींद्र सावंत यांचा वाढदिवस साजरा

नवी मुंबई ः कामगार नेते तथा ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचा वाढदिवस २५ फेब्रुवारी रोजी विविध समाजपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सफाई कामगारांचा सत्कार आणि अनाथ मुलांना भोजन दान करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शेलार तात्या, तानाजी जाधव, अशोक तोडकर, राहुल कापडणे, रामचंद्र माने, मंगेश गायकवाड, दीपक गावडे, सुधीर पांचाळ, कवलजित सोनवणे, गौरव महापुरे, स्वप्नील सोरटे, प्रकाश देसाई, सुमित लंबे, अर्चना वाघमारे, ज्योती रणखंबे, सीमा वाघ, अश्विनी पंडीत, रुपा साळुंखे, आदि उपस्थित होते. तसेच नेरुळ येथील तालुका कार्यालयात बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. नेरुळ येथील जीवन ज्योती आश्रम येथे अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात येऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अनाथ मुलांचा आनंदन द्विगुणित झाला. याशिवाय वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात असल्याची माहिती विद्या भांडेकर यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूमाफियांनी महापे एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागा बळकावून झोपड्या उभारण्याचा धंदा