जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई येथे येत्या ५ मार्च रोजी राज्यव्यापी महिला उद्योजक परिषदेचे आयोजन

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्यावतीने राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेचे आयोजन

नवी मुंबई : महिलांमध्ये उद्योगाचे बीज वाढवून महिला उद्योजक तयार करण्यासाठी, गेली २५ वर्ष कार्यरत असलेल्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान यांच्यावतीने येत्या ५ मार्च रोजी राज्यव्यापी महिला उद्योजक परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी सांगितले. या महिला परिषदेमध्ये चर्चा सत्र, परिसंवाद, उद्योजकता कॉन्सिल, अभ्यास दौरे आणि परिषदा माध्यमातून, रचनात्मक कार्य आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान तर्फे गेली २५ वर्ष अविरत सुरू आहे. यात महिला उद्योजकांनी तयार केलेला माल, वस्तू आणि विविध उत्पादनाना प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कामगिरी केली जाते. आम्ही उद्योगिनी हे त्रिमासिकद्वारे महिला उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ आणि यशस्वी उद्योगासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

  दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संपुर्ण दिवसभर परिषद मुंबईत आयोजित करण्यात येते यात महाराष्ट्र व गोवा राज्यातून हजारो महिला उद्योजकामध्ये उधमशीलता वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. दरवर्षी महाराष्ट्रातील मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, नाशिक व पुणे अशा ६ विभागांतून प्रत्येकी १ अशा ६ यशस्वी उद्योजक महिला आणि महिला उद्योजकांच्या कार्याला व्यापक आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी देणाऱ्या २ पत्रकार यांना उद्योगिनी पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा प्रतिष्ठानच्या वतीने गौरव केला जातो .यंदा ५ मार्च २०२३ रोजी, बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर पुर्व, मुंबई येथे सकाळी ९ ते ६ वाजे दरम्यान राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद  आयोजित करण्यात आले असल्याचे अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी सांगितले. उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी - ९८२०२९५३१५, ९६६४५४७१४६ संपर्क साधण्याचे आवाहन मोहाडीकर यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर