शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
साहित्य विचारधारा काव्य स्पर्धेत नवी मुंबईकर अनिल काकडे यांना तृतीय पुरस्कार
नवी मुंबईतील पत्रकार अनिल काकडे हे तिसऱ्या पुरस्काराचे मानकरी
वाशी :साहित्य विचारधारा समूहाच्या वतीने पुणे येथे भरविण्यात आलेल्या 'फुलाला गंध माझ्या शब्दाचा' यां काव्य उपक्रमाचे निकाल जाहिर झाले असून प्रथम पुरस्कार मैत्री संदिप व द्वितीय पुरस्कार डॉ. शिल्पा मॅडम यांना तर नवी मुंबईतील पत्रकार अनिल काकडे हे तिसऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
साहित्य विचारधारा समूह म्हणजे समाजातील विविध विषयावर भाष्य करणाऱ्या नवं कवींचं व्यासपीठ बनलं आहे. मनोज वढणे आशा चव्हाण, रश्मी हुले, सुनीता कानवसकर, पंकजा जगताप आदी मंडळीं निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत उत्कृष्ट तीन कवींची निवड केली आहे.तर भविष्यात समुहाच्या माध्यमातून अनेक नवं कवींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे साहित्य विचारधारा प्रयत्न शील असेल.