आ. मंदाताई म्हात्रे यांची शिष्टाई फळाला

‘सिडको'तर्फे ‘सीवुडस्‌ इस्टेट सोसायटी'ला ४२ लाखाचे मेन्टेनन्स चार्जेस जमा

नवी मुंबई : सीवुडस्‌ पस्ज-२ सेक्टर-५४,५६,५८ नेरुळ येथील सिडको निर्मित सीवुडस्‌ इस्टेट कॉ.ऑप.हौ.सोसायटी लि. या इमारतीत सुशिक्षित आणि उच्चभ्रू नागरिकांची वस्ती पहावयास मिळत आहे. परंतु, सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या मागणी वरुन ‘सिडको'च्या ताब्यात असलेल्या सदनिकांपैकी एकाही सदनिकांचे देय असलेले मेंटेनन्स चार्जेस गेल्या १२ वर्षात ‘सिडको'ने देय अद्याप पर्यंत सोसायटीला दिले नव्हते. त्यामुळे सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने सदरची केफियत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मांडून त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यानंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सीवुडस्‌ सोसायटीच्या शिष्टमंडळासोबत ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याशी २६ ऑगस्ट रोजी सदर विषयावर चर्चा केली. व्यवस्थापकीय संचालक डिग्गीकर यांनी देखील सदर विषयाची तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार ‘सिडको'च्या वतीने सीवुडस्‌ इस्टेट को-ऑप हौसिंग सोसायटीला ४२ लाख रुपये मेन्टेनन्सच्या रुपात देण्यात आले आहेत.

नवी मुंबई शहर सुनियोजित शहर असून या शहरामध्ये सर्व सुखसुविधा आहेत. तसेच या शहराच्या वैशिष्ठपूर्णरित्या निर्मितीमुळे ‘सिडको'कडे शहराची शिल्पकार म्हणून पहावयास मिळते. आज नवी मुंबई शहराने आधुनिकतेची कास धरलेली असल्याने शहरात मोठ-मोठ्या टोलेजंग इमारती पहायला मिळत आहेत. ‘सिडको'ने नेरुळ फेज-२ अंतर्गत सीवुडस्‌ सेक्टर-५४,५६,५८ येथे सिडको सीवुडस्‌ इस्टेट कॉ-ऑप हौसिंग सोसायटी उभारलेली असून या सोसायटीमध्ये सुशिक्षित आणि उच्चभ्रू नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु, सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीतील ‘सिडको'च्या ताब्यात असलेल्या सदनिकांपैकी एकाही सदनिकेचे देय असलेले मेन्टेनन्स चार्जेस गेल्या १२ वर्षात ‘सिडको'कडून सोसायटीला देण्यात आले नव्हते. त्यामुळे सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीच्या शिष्टमंडळाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची वलब हाऊस मध्ये बैठक घेऊन त्यांच्याशी सदर विषयावर चर्चा केली. त्यावेळी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन मेन्टेनन्सचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीच्या शिष्टमंडळासमवेत ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डिग्गीकर यांची २६ ऑगस्ट रोजी निर्मल भवन येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

चर्चेमध्ये सीवुडस्‌ इस्टेट कॉ-ऑप हौसिंग सोसायटीला ‘सिडको'च्या ताब्यातील सदनिकांचे देय असलेले मेन्टेनन्स चार्जेस गेल्या १२ वर्षापासून देण्यात आलेले नाही. तसेच सोसायटीतील दुरुस्तीचे काम, गळती समस्या, रंगकाम आदि महत्वाच्या गोष्टी प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डिग्गीकर यांना सांगितले. यानंतर व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या आदेशानुसार ‘सिडको'च्या वतीने सर्व सदनिका सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर सोयी सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून तब्बल ४२ लाख रुपये मेन्टेनन्स चार्जेसच्या रुपात सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीला प्राप्त झाले आहेत. शिवाय जे अजून काही मेन्टेनन्स चार्जेसची रक्कम बाकी आहे, ती देखील लवकरात लवकर मिळणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान, मेन्टेनन्स सह इतर समस्या मार्गी लावल्यामुळे सीवुडस्‌ इस्टेट को-ऑप हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी ॲड. सुहास वेखंडे, चेअरमन रंजन घोसाल, दिपक येवले आणि इतर पदाधिकारी-सदस्य यांनी आमदार मंदाताई म्हात्रे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक कोंडीमुक्त शाळा उपक्रमामुळे शाळांसमोरील वाहतूक काेंडी कमी