नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाची अधिसुचना जारी  

मुंबई-गोवा महामार्ग जड-अवजड वाहनांसाठी 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सण होईपर्यंत बंद  

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या  प्रमाणात खडडे् पडल्यामुळे गणेशोत्सवापुर्वी कोकणात जाणाऱया गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील जड-अवजड वाहनांची वाहतूक 27 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर  गणेशोत्सव सण पुर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सदर मार्गावरुन जाणा-या जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

येत्या 19 सफ्टेंबर पासून गणेशोत्सव सण साजरा होत असून या सणानितीत्त कोकणात जाणाऱया भाविकांची संख्या प्रचंड असते. मात्र सध्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या  प्रमाणात खडडे् पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी कोकणात जाणा-या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला यद्धपातळीवर सुरुवात केली आहे. गणेशोत्सवपुर्वी सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करणे गरजेचे असल्यामुळे एन.एच.ओ.आय.च्या अधिका-यांनी मुंबईकडून गोवा हायवेने जाणा-या अवजड वाहनांना 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा मार्गावर जाण्यास मनाई करुन सदर वाहनांना पर्यायी मार्गांनी वळविण्याची सुचना केली आहे.  

त्याअनुषंगाने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वजन क्षमता असलेल्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना गणेशोत्सव सण पुर्ण होईपर्यंत प्रवेश बंद करण्याबाबत अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार मुंबई गोवा महामार्ग क्रमांक-66 वर जड-अवजड वाहनांना दि. 27 ऑगस्ट पासून ते 28 सप्टेंबर पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत सदर मार्गावरुन जाणाऱया जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गावरुन जाण्याचे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई -गोवा महामार्गावरुन जाणा-या जड अवजड वाहनांना जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पळस्पे फाटा, कोळखे गाव, कोन फाटा, कोन गाव एक्सप्रेस ब्रिज, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, खालापुर, पाली फाटा, वाकण फाटा वरुन इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

तसेच पुणे-मुंबई क्रं. 4 वरुन येणा-या जड अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर जाण्यास पुर्णपणे बंदी करण्यात आली असून या वाहनांसाठी देखील पर्यायी मार्गावरुन जाण्याचे सुचित करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहनांना कोन फाटा, कोन गाव, एक्सप्रेस ब्रिज, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, खालापुर, पाली फाटा, वाकण फाटा वरुन इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या अधिसुचनेतून दुध, पेट्रोल, डिजेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणा-या वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना हि अधिसुचना लागू असणार नाही. असे नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपण यशस्वी