गणेश मंडळांकडून मंडप भाडे आणि अनामत रक्कम आकारण्यात सवलत

ठाणे महापालिका तर्फे सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे, अनामत रक्कमेतून सूट

ठाणे ः सार्वजनिक सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे व्हावेत आणि उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे आणि अनामत रक्कम आकारण्यात येवू नये, असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांकडून मंडप भाडे आणि अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असा निर्णय घ्ोवून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

येत्या १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विविध परवानग्यासाठी धावपळ सुरू आहे. सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेश मंडळांना मंडप भाडे आणि अनामत रक्कम आकारण्यात येवू नये, असा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात होणार असून परवानगीसाठी येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप भाडे आणि अनामत रक्कम संपूर्णतः माफ करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली.

सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक त्या परवानग्या विनाविलंब घेता याव्यात यासाठी प्रभाग समितीनिहाय व्यवस्था उभारण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी (रस्ते/पदपथावर) तात्पुरते स्वरुपात मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरिता महापालिकेने संगणक प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास मंडळाना पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडे परवानगीसाठी किंवा ना-हरकत दाखल्यासाठी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा थेट  ूस्म्स्ीह्‌ीज्.न्ग्‌प्ेग्‌्‌ग्हदिम्प्त्त्ज्.म्दस् या लिंकवर आणि ठाणे महापालिकेच्या ैैै.ूप्ीहाम्ग्ूब्.ुदन्.ग्ह  या संकेतस्थळावर ‘मंडप परवानगी' या शीर्षाखली उपलब्ध आहे. सदरची लिंक १० सप्टेंबर २०२३ पर्यत सुरू राहणार असून त्यापूर्वी सर्व मंडळांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

मंडप परवानगीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जासोबत मागील वर्षी दिलेल्या परवानगीची प्रत, मंडप उभारण्यात येणाऱ्या जागेचा रफ नकाशा, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, मोबाईल नंबरसह यादी आणि मंडपात अग्निशमन सिलेंडर ठेवल्याबाबतचे अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडील प्रमाणपत्राची प्रत पीडीएफ स्वरुपात अपलोकड करावी.

सार्वजनिक उत्सव मंडळांनी दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते स्वरुपात मंडप उभारण्याकरिता ठाणे महापालिकेच्या धोरणानुसार आवश्यक ती परवानगी घ्ोतल्यानंतरच मंडप उभारणीस सुरुवात करावी.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी पत्राची प्रत मंडप उभारण्याच्या ठिकाणी किंवा मंडपाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असेल. परवानगी पत्राची प्रत दर्शनी भागावर न लावल्यास सदरचे मंडप विनापरवानगी उभारले आहे, असे गृहित धरुन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्‌भवल्यास संबंधित प्रभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी तसेच भ्रमणध्वनी क्र. ८०९७१९२८६८ वर संपर्क साधावा.

उच्च नयालयाचे आदेश, शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि ठाणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सार्वजनिक उत्सव साजरा करावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिव्ोÀने निर्गमित व्ोÀलेल्या नियमावलीचे पालन करुन ठाणे महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण नगर परिषदेकडून गांधी चौक परिसरातील रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार