स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा 

विंधणे येथील आदिवासी बांधवांना रेशनकार्ड, विविध दाखल्याचे उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांच्या हस्ते वाटप

उरण : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त तालुक्यातील मुख्य कार्यालय म्हणून मंगळवारी ( दि१५ आँगस्ट ) उरण तहसील कार्यालयाजवळ उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उरण न्यायालय,उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी पोलीस ठाणे, उरण नगर परिषद, उरण पंचायत समिती, जेएनपीए बंदर,इतर शासकीय कार्यालय, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, विविध प्रकल्प, चिरनेर व जासई येथील हुतात्मा स्मृती स्तंभ, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच, अधिकारी, मुख्याध्यापक व इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आदिवासी मुलांनीही राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

भारत देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिन अमुत महोत्सवाचे औचित्य साधून हर घर तिरंगा म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला हाक देत घरोघरी तिरंगा फडकविण्यात आला होता. यावेळी गावा गावात शिक्षकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी,माजी आमदार मनोहर भोईर, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगले, उरण पंचायत समितीचे एस.पी.वाठारकर, उद्योगपती पी.पी.खारपाटील, राजाशेठ खारपाटील, जासई सरपंच संतोष घरत,चाणजे सरपंच अमिताभ भगत, धुतूम सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर,बोकडविरा सरपंच सौ अर्पणा मनोज पाटील,कोप्रोली सरपंच सौ अलका म्हात्रे, बांधपाडा सरपंच सौ विशाखा प्रशांत ठाकूर, म्हातवली सरपंच सौ रंजना चारुदत्त पाटील,विंधणे सरपंच सौ निसर्गा रोशन डाकी, चिर्ले सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील, पागोटे सरपंच कुणाल पाटील,सोनारी सरपंच सौ पुनम महेश कडू सह इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच विंधणे येथील आदिवासी बांधवांना रेशनकार्ड, विविध दाखल्याचे वाटप उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.                 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन