‘खेळ खेळूया मंगळागौरीचा'मध्ये महिलांकडून परंपरेचे सादरीकरण


‘श्री गोवर्धनी संस्था'च्या माध्यमातून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन - आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : श्रावण मास धार्मिक व्रत-वैकल्यांचा, सणांचा पवित्र महिना समजला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्व आहे. तसे श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहे. शिवपुजनाला महत्व असणाऱ्या या पवित्र महिन्याची वाट महिला वर्ग वर्षभर बघत असतात. याच महिन्यात येणारे मंगळागौरीचं व्रत मुख्यत्वे नवविवाहित महिलांकडून तसेच सुहासिनी स्त्रियांकडून पाळले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत मानले जाते. त्याअनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा' कार्यक्रमाचे १२ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी ‘मंगळागौरी' कार्यक्रमाचे ‘संस्था'च्या सर्व सदस्यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. यावेळी ‘महाराष्ट्राची उद्योगिनी ग्लोबल वेलनेस'च्या ॲम्बेसेडर रेखा चौधरी, ‘सिडको'च्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे आणि समाजसेविका उषा दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था' गेली २८ वर्षे खास महिलांसाठी सांस्कृतिक महोत्सव आणि विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत.

‘खेळ खेळूया मंगळागौरीचा'मध्ये महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, उत्साह आणि आत्मविश्वास जागृत झाल्याचे पहावयास मिळाले. सदर कार्यक्रमात घरात असणारी गृहिणींसह डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षिका, नर्स आदि विविध क्षेत्रातील महिला वयाचे बंधन न बघता मोठ्या उत्साहात आणि नटून थटून सहभागी झाल्या होत्या. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'ने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नेहमीच व्यासपीठ उभे करुन दिले आहे. त्याचा फायदा आजवर हजारो महिलांनी घेतला आहे. आशिमीत कामठे आणि सायली राऊत यांच्यासारखी कलाकार मंडळी याच व्यासपीठाच्या माध्यमातून तयार झाली आहेत, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना दिली.

‘खेळ खेळूया मंगळागौरीचा'मध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रातील महिलांनी विविध प्रकारचे खेळ खेळून पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली परंपरेचे सादरीकरण केले. यामध्ये मंगळागौरीची पारंपारिक नृत्य, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद महिलांनी आनंद लुटला. तसेच यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी बोलून आणि खेळ खेळण्याची संधी महिलांना मिळाली. तसेच मंगळागौरीच्या कार्यक्रमात एकूण १५ महिला मंगळागौरी ग्रुपने सहभाग घेतला होता. सदर
कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य म्हणून माऊली ग्रुप (नेरुळ), स्वरांजली कल्पतरु ग्रुप (सीबीडी), साईभक्त महिला मंडळ (सानपाडा) या सर्वांना एकत्रित रोख रक्कम, पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट मराठमोळ्या वेशभूषा म्हणून लता पवार यांना सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले. यात उत्तेजनार्थ म्हणून गुड शेफर्ड स्वुÀल (बेलापूर), जयश्री लोंडे ग्रुप (सीबीडी), रिदम डान्स ग्रुप (नेरुळ), प्रगती ग्रुप (सीबीडी), शीतल फिटनेस ग्रुप (नेरुळ), सायली आर्टस्‌ ग्रुप (सीबीडी) यांनाही रोख रक्कमेसह पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच नशीबवान महिला म्हणून लकी ड्रॉद्वारे इंदुमती पाटील, हेमलता आसोले (सानपाडा), सविता पांचाल (वाशी), योगिता म्हात्रे, कुसुम म्हात्रे (बेलापूर), मनिषा मोरे, स्मिता जोवेल (नेरुळ पूर्व), उषा सिंह, पूर्व सूर्यवंशी (नेरुळ पश्चिम), रंजना ठाणगे, वैशाली जगदाळे (सीवुडस्‌) यांना प्रत्येकी पैठणी तसेच सोन्याची नथ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात
आले.

याप्रसंगी ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या अध्यक्षा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका संगीता सुतार, कविता जाधव, रत्ना विश्वासराव, नमिता म्हात्रे, शारदा आमले, उल्का तिकोने, स्वाती म्हात्रे, वंदना चौधरी, उर्मिला भाटीया, आरती राऊल, देवयानी मुकादम, शीतल जगदाळे, अलका कामत, चैताली ठाकूर, मनिषा मनोरे, सुरेखा
बामनकर, ममता सिंग, लाजवंती भोसले, सुमन डोहळे, ज्योती पाटील तसेच विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी-सदस्या, महिला शिक्षिका वर्ग, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मी खास महिलांसाठी नेहमीच कार्यक्रम करीत आलेली आहे. जवळजवळ गेली २८ वर्षे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत आली आहे. यामध्ये उद्योजिका शिबीर, बचत गटांकरिता विविध उपक्रम नेहमीच होत असतात. महिलांनी काहीतरी करावे, स्वतःच्या पायावर उभे रहावे, कुबड्या करुन कुठल्याही महिलेने जीवन जगू नये अशी माझी मनोमन इच्छा असते. त्यानुसार आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महिलांसाठी आपण काहीतरी थोड काम केल पाहिजे या जाणिवेतून आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध कार्यक्रम घेत असते. ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा' कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘संस्था'ने फवत ३ तासामध्ये महिलांना फवत आनंद देण्याचे काम केले आहे. महिलांनी देखील आपले देहभान हरपून  कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण न्यायालयामध्ये लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय