शाळेतील  अंतर्गत सुरक्षा  वाढवण्याची पालकांची मागणी

सेंट मेरी हायस्कूल मधील घटनेमुळे पालकांच्या मनात धडकी ?

वाशी : वाशी येथील सेंट मेरी मल्टिपर्पज हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी ११ वर्षीय विद्यार्थिनी शनिवारी सकाळी शाळेच्या शौचालयात मृतावस्थेत आढळल्याने  एकच खळबळ माजली असून  या घटनेने पालकांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे भविष्यात इतर कुणा सोबत अशी घटना घडू नये म्हणून शाळेतील अंतर्गत सुरक्षा तसेच महिला शौचालयाबाहेर कायम स्वरुपी मदतनीस नेमण्याची मागणी शाळा प्रशासनाला पालकांनी केली आहे.

वाशीतील सेंट मेरी हायस्कूल ही नावाजलेली शाळा आहे. मात्र  शाळेच्या शौचालयात  शनिवारी १६  जुलै रोजी सहावीतील मृतावस्थेत आढळल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले  आहे.प्राथमिक तपासात या विद्यार्थिनीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मागील आठवड्यात याच शाळेतील  दुसऱ्या  माळ्यावर  पाचवीतील मुलगी शौचालयाला बाहेरून बंद केल्याने ती २० ते २५ मिनिट आत मध्ये अडकली होती . तिने आरडा ओरड केल्यानंतर दरवाजा उघडल्या नंतर तिची सुटका झाली अशी माहिती एका महिलेने दिली आहे.तर शनिवारी शौचालयात एक मुलगी मृत आढळल्याने पालक वर्गात शंकांचे काहूर माजले  अजून पालक भयभीत झाले आहेत.त्यामुळे शाळेत आपल्या पाल्यांना शाळेत योग्य सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी जुहुगावातील सामाजिक कार्यकर्त्या दर्शना भोईर यांच्या समवेत पालकांनी शाळा प्रशासनाची भेट घेतली.यात शाळेतील अंतर्गत भागात तसेच शौचालया बाहेर सी सी. टिव्ही लावणे,महिला  शौचालयाबाहेर कायम स्वरुपी मदतनीस नेमणे, शौचालयाची  व वर्ग खोल्यांची दुरुस्ती करणे व पालक आल्या खेरीज पाल्यांना शाळे बाहेर न सोडणे  आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या  आहेत.तर या  मागण्या मान्य न केल्यास  शाळा प्रशनासनाविरोधात तीव्र  आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी  पालकांच्या वतीने देण्यात आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पार्किंग पॉलिसी नियोजनाला बैठकांद्वारे गतिमानता